Supreme Court  Dainik Gomantak
देश

Supreme Court: 'धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा'

Hate Speech: धार्मिक किंवा सांप्रदायिक आधारावर भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: धार्मिक किंवा सांप्रदायिक आधारावर भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केली आहे. सांप्रदायिक आधारावर प्रक्षोभक वक्तव्य करणारा तो कोणत्याही धर्माचा असो, त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. औपचारिक तक्रार दाखल होण्याची वाट न पाहता पोलीस प्राधिकरणाने अशा प्रकरणांमध्ये स्वत:हून कारवाई करावी.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारला सूचना दिल्या

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारला अशा वक्तव्यांची दखल घेऊन गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. कारवाई न केल्यास न्यायालयाचा अवमान मानला जाईल. न्यायालयाने भाजप खासदार परवेश वर्मा आणि मुस्लिम समाजाविरोधातील आक्षेपार्ह विधानांविरोधात दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) 9 ऑक्टोबर रोजी कारवाईचा अहवाल मागवला आहे.

राज्य पोलिसांना नोटीस बजावली

यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड (Uttarakhand) पोलिसांना नोटीस बजावली आहे. द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांवर काय कारवाई केली, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. तक्रार नसेल तर पोलिसांनी स्वतःच दखल घेऊन कारवाई करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भडकाऊ भाषण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निष्काळजीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई केली जाईल, असेही सांगितले.

धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोहोचलो?

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला एकतर कारवाई करा, अन्यथा अवमानासाठी तयार राहा, असे सांगितले. न्यायालयाने प्रक्षोभक भाषणावर आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, 21 व्या शतकात काय चालले आहे? धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोहोचलो? आपण देवाला किती लहान केले आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT