NEET exam 2022 Dainik Gomantak
देश

NEET PG Exam सात दिवसांनंतर होणारच

NEET PG परीक्षा या वर्षी पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे.

दैनिक गोमन्तक

NEET PG Exam: 21 मे रोजी होणारी NEET PG परीक्षा या वर्षी पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. त्यामुळे ही परिक्षा आता वेळेत होणार आहे. अवघ्या सात दिवसांनंतर देशातील मडिकलच्या विद्यार्थ्यांना NEET परिक्षेला बसता येणार आहे.

परिक्षा रद्द करणे म्हणजे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 2021 ची मेडिकल पीजी प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे त्यामुळे 2022ची परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात यावी. असे याचिकेत म्हटले होते.

खरं तर, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. IMA ने आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांना पत्र लिहून NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. NEET PG 2022 ची परीक्षा 21 मे रोजी घेतली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, NEET PG 2021 समुपदेशनाला उशीर झाल्यामुळे विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत होते. त्यानंतर आयएमएनेही आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विचार करण्यास सांगितले आहे.

विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

इंडियन मेडिकल असोसिएशनने या पत्रात पुढे म्हटले आहे की, राज्यांमधील रिक्त पदांसाठीचे समुपदेशन मेच्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. IMA ने पत्रात नमूद केले आहे की, 05 ते 10 हजार इंटर्न, ज्यांनी कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून काम केले आहे, त्यांच्या परीक्षा पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे NEET PG ला बसता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन NEET PG परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. असे करणे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT