Baba Ramdev Dainik Gomantak
देश

Patanjali Advertisement Case: दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी बाबा रामदेव यांना दिलासा नाहीच; SC चा आदेश- ''एक आठवड्यात चूक सुधारा''

Supreme Court: दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी योगगुरु बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाच नाही.

Manish Jadhav

Patanjali Advertisement Case: दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी योगगुरु बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाच नाही. आज झालेल्या (मंगळवारी) सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांनी पुन्हा एकदा माफी मागितली, मात्र न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए. अमानतुल्ला यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'सार्वजनिकरित्या माफी मागण्याची मागणी तुमच्याकडे केली होती.' बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी आठवडाभरात आपली चूक सुधारण्यासाठी पावले उचलावीत, असे न्यायालयाने म्हटले.

दरम्यान, मुकुल रोहतगी बाबा रामदेव यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. ते म्हणाले की, ''स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचा प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी, समूह स्वतःच्या पुढाकाराने काही अतिरिक्त पावले उचलेल. त्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिला जातो. 5-6 प्रतिवादींच्या विनंतीनुसार न्यायालयाने प्रस्तावित प्रतिस्पर्ध्यांशी संवाद साधला. हे प्रकरण 23 एप्रिल रोजी सूचीबद्ध केले जावे आणि प्रथम सुनावणी व्हावी.''

सुनावणी दरम्यान काय घडले...

याआधी सुनावणीदरम्यान बाबा रामदेव म्हणाले होते की, 'आमच्याकडून जी काही चूक झाली आहे त्याबद्दल आम्ही बिनशर्त माफी मागतो.' त्यावर न्यायमूर्ती कोहली म्हणाले होते की, 'तुम्ही प्रचार करत होतात त्याबद्दल तुम्ही काय विचार केला. आपल्या देशात अनेक पद्धती आहेत. परंतु इतर औषधे खराब आहेत, असं का?' त्यावर रामदेव म्हणाले की, 'आम्ही न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो. आम्ही पाच हजार रिसर्च करुन एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेदला प्रस्तुत केले.'

न्यायमूर्ती कोहली म्हणाल्या की, 'तुमच्या वकिलाने इथे स्पष्टपणे सांगितले की, भविष्यात असे होणार नाही. असे असतानाही तुम्ही इतर औषधांबाबत जाहीरपणे वक्तव्ये केली.' त्यावर बाबा रामदेव म्हणाले की, 'आम्ही असे बोलायला नको होते. आतापासून आम्ही काळजी घेऊ.'

कोरोनिल औषधाने कोरोना बरा होण्याच्या जाहिरातीबाबत खंडपीठाने बाबा रामदेव यांना विचारले, शेवटची जाहिरात कधी प्रसिद्ध झाली? त्यावर फेब्रुवारीमध्येच प्रसिद्ध झाल्याचे उत्तर देण्यात आले. तेव्हा तुम्हाला आधीच ताकीद दिली असतानाही असे का केले, असा सवाल न्यायाधीशांनी केला. यावर बाबा रामदेव म्हणाले की, आम्हाला कायदा इतका कळत नाही. यापुढे आपण हे लक्षात ठेवू आणि अशा चुका होणार नाहीत. एवढेच नाही तर यावेळी आचार्य बाळकृष्ण यांनीही ही चूक झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, कायदेशीरदृष्ट्या आम्ही ते करायला नको होते. यावर न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले की, 'तुम्ही इतर कोणाकडे बोट दाखवू शकत नाही. तुम्ही दुसऱ्याचा अपमान कसा करु शकता?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT