Supreme Court  Dainik Gomantak
देश

''तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला...''; सनातन धर्माबाबत उदयनिधी स्टॅलिन यांना SC ने फटकारले

Udhayanidhi Stalin: सनातन धर्माबाबत भाष्य केल्याबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.

Manish Jadhav

Supreme Court Udhayanidhi Stalin: सनातन धर्माबाबत भाष्य केल्याबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. तुम्ही मंत्री आहात आणि त्याचे परिणाम तुम्हाला कळायला हवेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. उदयनिधी हे तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक सरकारमध्ये मंत्रीही आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी सनातन धर्माची तुलना करोना आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती.

वास्तविक, उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर नोंदवलेल्या एफआयआर क्लब करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले की, ''तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे... तुम्ही काय वक्तव्य केलं ते तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला परिणामांची जाणीव असायला हवी. तुम्ही मंत्री आहात, सामान्य व्यक्ती नाही.''

स्टॅलिन यांच्या वतीने न्यायालयात हजर झालेले अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांचे म्हणणे आहे की, ते वक्तव्य समर्थन करत नाही. स्टॅलिन यांच्या विरोधात 6 राज्यांमध्ये एफआयआर नोंदवले गेले आहेत आणि ते क्लब करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी न्यायालयाने त्यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. सिंघवी पुढे म्हणाले की, 'मला 6 उच्च न्यायालयात जावे लागेल. यातच मी गुंतून राहील... खटला चालण्याआधीच हा त्रास सुरु होईल.'

सुनावणीदरम्यान सिंघवी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी, अमिश देवगण, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा आणि मोहम्मद जुबेर यांच्याशी संबंधित प्रकरणांचा वारंवार उल्लेख केला. सिंघवी यांनी वारंवार विनंती केल्यानंतर न्यायालयाने याचिकेवर विचार करण्याचे मान्य केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काय प्रकरण होते

गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी उदयनिधी म्हणाले होते की, ''काही गोष्टी आहेत, ज्यांचे आपल्याला समूळ उच्चाटन करावे लागेल. आपण त्या गोष्टींना फक्त विरोध करु शकत नाही. डास, डेंग्यू, कोरोना (Corona) आणि मलेरिया यांचा फक्त विरोध करुन चालणार नाहीतर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे. सनातन बाबतही असेच केले पाहिजे, त्याचा विरोध करुन चालणार नाहीतर त्याचे समूळ उच्चाटन करणे हे आपले पहिले काम असले पाहिजे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT