suicide attempt girl jumps from terrace of akshardham metro station cisf police saved  DainikGomantak
देश

मेट्रो स्टेशनच्या छतावरून मुलीने मारली उडी, पोलिसांनी वाचवले प्राण

सीआयएसएफ आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मिळून मुलीचे प्राण वाचवले

दैनिक गोमन्तक

दिल्लीतील अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर आज एका मुलीने स्टेशनच्या भिंतीवरून उडी मारल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, सीआयएसएफ आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मिळून मुलीचे प्राण वाचवले ही दिलासादायक बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर गुरुवारी सकाळी 7.28 च्या सुमारास CISF क्विक रिअॅक्शन टीमच्या जवानांना एका मुलीला मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून तेथून उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवले. हे दृष्य पाहताच पोलिसांनी तिच्याकडे धाव घेतली. आणि एका मोठ्या पडद्याच्या मदतीने तिला झेलले आणि तिचे प्राण वाचवले.

दरम्यान, ती बेशुध्द पडली, त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र अद्याप तीने हे टोकाचे पाऊल का उचलले ते समजले नाही. मात्र मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. मुलगी शुद्धीवर येताच आम्हाला पुढील तपास करता येणार असल्याचे मत पोलिसांना (Police) व्यक्त केले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांच्या बडगामच्या जैनपुरा भागात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती आहे. या माहितीनंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या कारवाईचे चकमकीत रूपांतर झाले असून हा अहवाल येईपर्यंत चकमक सुरूच असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, आतापर्यंत येथे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आम्ही या संदर्भात अधिक माहितीची वाट पाहत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT