BJP MP Locket Chatterjee  Dainik Gomantak
देश

Sandeshkhali Violence: ''पाकिस्तानात हिंदू महिलांवर असे अत्याचार होतात...'', संदेशखळी प्रकरणावरुन भाजप खासदार ममता सरकारवर बरसल्या

BJP MP Locket Chatterjee: संदेशखळी (Sandeshkhali) प्रकरणावरुन पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.

Manish Jadhav

Sandeshkhali Violence: संदेशखळी (Sandeshkhali) प्रकरणावरुन पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. बंगालचे संपूर्ण राजकारण सध्या संदेशखळीभोवती फिरत आहे. तिथल्या काही महिलांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. स्वतंत्र तपास करण्यात आला मात्र अद्याप आरोपींबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही. त्या प्रकरणावरुन आता संदेशखळी हे राजकीय रणांगण बनले असून तीन दिवसांपासून भाजप आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे.

दरम्यान, संदेशखळीबाबत भाजप (BJP) खासदार लोकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, 'टीएमसीचे गुंड हिंदू महिलांना टार्गेट करतात आणि त्यांचा छळ करतात.' पत्रकार परिषदेला संबोधित करताना लोकेट म्हणाल्या की, ''देशात एकच महिला मुख्यमंत्री असून त्यांचेच राज्य महिलांसाठी सर्वात असुरक्षित आहे. 2011 मध्ये महिलांनीही ममता बॅनर्जींना मतदान केले होते. त्यावेळी, डाव्या सरकारमध्ये त्यांना असुरक्षित वाटत होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी त्यांचा विश्वासही तोडलात.''

त्या पुढे म्हणाल्या की, 'संदेशखळीमध्ये काय झाले हे संपूर्ण देशाला माहीत आहे. महिला मुख्यमंत्री असूनही राज्यात महिलांवर बलात्कार होतात पण त्या चकार शब्द काढत नाहीत. त्या पुढे असेही म्हणाल्या की, ''टीएमसीच्या गुंडांनी आधी महिलांवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर त्यांची घरे लुटली. जेव्हा महिलांनी आवाज उठवला तेव्हा त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला.''

लोकेट चॅटर्जी पुढे म्हणाल्या की, 'ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आतापर्यंत यासंबंधी एकही वक्तव्य केलेले नाही. शहाजहान शेख अद्याप फरार आहे. पोलिसही त्याला पकडू शकत नाहीत.' ममता बॅनर्जींनी सांगितले की, आतापर्यंत एकही एफआयआर दाखल झालेला नाही. पोलीस प्रशासनही टीएमसीचे कार्यालय बनले आहे, त्यामुळे गुन्हाही दाखल होत नाही.'

चटर्जी पुढे म्हणाल्या की, सत्तेत असणाऱ्या लोकांना 30 टक्के मते हवी आहेत, म्हणूनच ते हिंदू महिलांची शिकार करत आहेत. अशा प्रकारचे अत्याचार आपण फक्त पाकिस्तानातच ऐकले आहेत. अशाच घटना आता पश्चिम बंगालमध्ये घडत आहेत पण ममता बॅनर्जी गप्प आहेत. दुसरीकडे, यामागे आरएसएसचा हात असल्याचे ममता सरकारचे म्हणणे आहे. याआधी बीरभूममध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT