Aditya-L1 Mission Dainik Gomantak
देश

ADITYA-L1: शास्त्रीय माहिती गोळा करण्यास ‘आदित्य-एल 1’कडून सुरुवात

ADITYA-L1: भारताचे पहिले सौर यान ‘आदित्य-एल१’ने शास्त्रीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

ADITYA-L1: भारताचे पहिले सौर यान ‘आदित्य-एल१’ने शास्त्रीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ‘द सुप्रा थर्मल अँड एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर’ (एसटीइपीएस- स्टेप्स) या उपकरणाच्या संवेदकाने (सेन्सर) पृथ्वीपासून 50 हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून सुप्रा-थर्मल आणि ऊर्जाक्षम आयनचे मोजमाप घेण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती ‘एक्स’वरील पोस्टवर सोमवारी दिली आहे. पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास ही माहिती शास्त्रज्ञांना उपयोगी ठरणार आहे. ‘इस्रो’ने एक आलेख शेअर केला आहे. त्यात ऊर्जाक्षम कणांच्या वातावरणातील फरक नोंदविला आहे.

‘आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपिरीमेंट’ या उपकरणातील ‘स्टेप्स’ हे एक साधन आहे. शास्त्रीय माहिती गोळा करण्यास त्याने सुरुवात केली आहे.

या साधनात सहा सेन्सर आहेत. 10 सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून 50 हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर सक्रिय करण्यात आले. पृथ्वीच्या उत्सर्जित किरणांच्या पट्ट्याबाहेर ‘स्टेप्स’ स्थापित केले आहे.

उपकरणाच्या आवश्यक तपासणीनंतर ते पृथ्वीपासून आणखी ५० हजार किमी दूर जाईपर्यंत माहिती गोळा करण्याचे कार्य सुरू राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

पाकड्यांच चाललंय काय? शाहीन आफ्रिदीनं सिकंदर रझाला गुपचूप हॉटेलमध्ये नेलं; रात्री 2 तास दोघांमध्ये... बोर्डानं ठोठावला 10 लाखांचा दंड

Lairai Jatra: ‘लईराई’च्या जत्रेत स्टॉलसाठी मोकळीक द्या! खाजेकार संघटनेची मागणी; व्यावसायिक अस्वस्थ

शेतजमिनी, डोंगर सगळेच कत्तल करून 'बिल्डर लॉबी'ला विकायला लागलो तर इमारतीची जंगले विस्तारतील; आकारवाड्यातील वनराईची श्रीमंती

SCROLL FOR NEXT