Withdraw farm bills, guarantee MSP: Rahul Gandhi tells government
Withdraw farm bills, guarantee MSP: Rahul Gandhi tells government 
देश

काँग्रेसचे आता ‘शेतकऱ्यांसाठी बोला’

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकांचा विरोध तीव्र करण्यासाठी कॉंग्रेसने आता ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ (शेतकऱ्यांसाठी बोला) ही मोहीम सोशल मीडियावर  सुरू केली असून पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी  काँग्रेसच्या  या मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. 

संसदेत कृषी सुधारणा विधेयकांना विरोध केल्यानंतर आता संसदेबाहेरही पक्षाची आक्रमकता कायम ठेवण्यासाठीच्या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसच्या या मोहिमेकडे पाहिले जाते.  “मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर होणारा अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन विरोध करावा”, असे ट्विट करून राहुल गांधींनी आज या मोहिमेचा प्रारंभ केला.

या ट्विटसोबत जोडलेल्या मोहिमेशी संबंधित ध्वनिचित्रफितीमध्ये म्हटले आहे, की ‘‘ मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना बरबाद करणारी धोरणे राबवीत आहे. याआधी शेतकऱ्यांची जमीन बळकावणारा अध्यादेश आणला होता, तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने  शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार परत मिळवून दिला होता. आता पुन्हा शेतकऱ्यांच्या हितावर भाजप सरकारने हल्ला चढविला असून त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस  लढण्यासाठी तयार आहे. शेतकरी विरोधातील तिन्ही काळे कायदे मागे घेतले जावेत.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

Goa Rain Update : पणजीसाठी २२ दिवस धोक्याचे; यंदाच्या पावसाळ्यात उसळणार साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Goa News : काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT