Jharkhand Crime News: स्पेनमधून भारताला भेट देण्यासाठी आलेल्या एका महिलेवर अत्याचाराची भीषण घटना घडल्याने सर्वजण हादरले आहेत. ही महिला पतीसोबत बाईक टूरवर भारतात आली होती. याआधी ती पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशलाही गेली होती. बांग्लादेशमार्गे हे जोडपे झारखंडमध्ये दाखल झाले आणि त्या महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केला. महिला पतीसोबत टेंटमध्ये झोपली असताना 7 जणांनी महिलेवर अत्याचार करुन दुचाकीवरुन पळ काढल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, झारखंडमधील दुमका येथील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 पैकी तिघांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे दुमका मार्गे भागलपूरच्या दिशेने जात होते आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी दुमका येथील हंसदिहा मार्केटजवळ एका निर्जन ठिकाणी तंबू ठोकला होता. मिळालेल्या माहितीनुसार, जोडप्याला टेंटमध्ये झोपलेले पाहून काही लोक तिथे पोहोचले आणि त्यांना मारहाण केली आणि महिलेवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर महिलेने गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला थांबवून या प्रकरणाची माहिती दिली.
दुसरीकडे, या महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे आणि तिच्यावर झालेल्या क्रौर्याबद्दल सांगत आहे. तिने सांगितले की, भारतात माझ्यासोबत असे काही घडेल याची कल्पनाही केली नव्हती. येथे 7 जणांनी माझ्यावर बलात्कार केला, मारहाण केली आणि लुटले. तिने पुढे सांगितले की, आमच्याकडे जास्त काही नाही, त्यांना फक्त माझ्यावर बलात्कार करायचा होता. सध्या आम्ही पोलिसांसोबत हॉस्पिटलमध्ये आहोत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार निशिकांत दुबे यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, “मी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो. कोणत्याही जातीच्या आधारे पोस्टिंग केल्यास अशा घटना वारंवार घडतील. ते पुढे म्हणाले की, “या राज्यात आदिवासी किंवा दलित दोघेही सुरक्षित नाहीत. राज्यात महिलाही सुरक्षित नाहीत. आता एक आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे की एक स्पॅनिश महिला तिच्या पतीसोबत भारतात येते आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे कळते. हे लाजिरवाणे आहे. इथे भारताची प्रतिमा खराब होत आहे ना की चंपाई सोरेन यांची."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.