southern railway loud music ban trains Dainik Gomantak
देश

Southern Railways Rules: रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी, रील्स लावल्यास होणार कारवाई; दक्षिण रेल्वेचा प्रवाशांना कडक इशारा! नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

southern railway loud music ban trains: रेल्वे प्रवासात मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, स्पीकरवर व्हिडिओ किंवा समाजमाध्यमांवरील रील्स पाहणे तसेच मोठ्याने फोनवर बोलून सहप्रवाशांना त्रास देणे महागात पडू शकते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: रेल्वे प्रवासात मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, स्पीकरवर व्हिडिओ किंवा समाजमाध्यमांवरील रील्स पाहणे तसेच मोठ्याने फोनवर बोलून सहप्रवाशांना त्रास देणे महागात पडू शकते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दक्षिण रेल्वेने प्रवाशांना सावध केले असून, संबंधित गैरवर्तनासाठी रेल्वे कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी विश्रांती घेत असतात, काही जण झोपलेले असतात, तर काहींना काम करायचे असते. अशा वेळी मोबाईलवर (Mobile) मोठ्या आवाजात गाणी किंवा व्हिडिओ सुरू ठेवल्यास इतर प्रवाशांच्या शांततेचा भंग होतो. त्यामुळे मोबाईल वापरताना आवाज कमी ठेवावा आणि गाणी, चित्रपट किंवा रील्स पाहण्यासाठी इअरफोनचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

दक्षिण रेल्वेच्या सूचना

दक्षिण रेल्वेच्या चेन्नई येथील मुख्यालयाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात रेल्वेगाड्या आणि स्थानकांमध्ये मोबाईलवर स्पीकरद्वारे मोठ्या आवाजात संगीत किंवा ध्वनिमुद्रिका वाजविल्याने सहप्रवाशांना त्रास होत असल्याचे नमूद केले आहे. याबाबत प्रादेशिक भाषांसह हिंदी आणि इंग्रजीतून सार्वजनिक उद्घोषणा करण्याचे, तसेच स्थानकांवर सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे कायद्यातील कलम १४५ च्या सुधारित तरतुदीनुसार, उपद्रव करणाऱ्या प्रवाशाला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्याने मनाई केल्यानंतरही संबंधित प्रवाशाने उपद्रव सुरू ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास, पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. परिस्थितीनुसार प्रवाशाला रेल्वेतून उतरविण्याची आणि तिकिटासंबंधी कारवाई करण्याचीही तरतूद आहे. रेल्वे प्रवासात शांतता राखणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे. मोबाईलवर बोलताना आवाज कमी ठेवणे, इअरफोन वापरणे आणि सहप्रवाशांच्या विश्रांतीचा आदर करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Political Reservation: 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण प्रक्रिया पूर्ण करा; अनुसूचित जमातींचा सावंत सरकारला अल्टीमेटम!

Goa Beach: समुद्रकिनाऱ्यांवर औषधांना दाद न देणारे जीवाणू, NIO चा निष्कर्ष; पावसाळ्यात 50 टक्के पाण्याची गुणवत्ता खराब

"हे नक्की काय चाललंय?", भोममधील बागायती जमिनीच्या रुपांतरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सरपंचांना निवेदन देत आंदोलनाचा दिला इशारा!

Mandovi River Water Pollution Report: कॅसिनो आणि सागरी नौकांच्या परिसरातील मांडवी नदीचे पाणी किती सुरक्षित? प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुसरा अंतरिम अहवाल सादर!

CK Nayudu Trophy: आर्यन नार्वेकर, दिशांक मिस्कीन अन् जीवनकुमारची दमदार फलंदाजी, बिहारविरुद्ध गोव्याची द्विशतकी मजल

SCROLL FOR NEXT