Delhi Jahangirpuri Violence Dainik Gomantak
देश

Delhi Jahangirpuri Violence: गोळीबार करताना अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल

दिल्लीच्या (Delhi) जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत हिंसाचारादरम्यान गोळीबार आरोप करणाऱ्या सोनू चिकना या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Jahangirpuri Violence: दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत गोळीबार करणाऱ्या सोनू चिकना या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे जहांगीरपुरी हिंसाचाराशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता, ज्यामध्ये निळा कुर्ता घातलेला एक व्यक्ती पिस्तुलाने गोळीबार करताना दिसत होता. दिल्ली (Delhi) पोलिसांकडून आता गोळीबाराचा आरोपी सोनू चिकनाला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसाचारप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 2 अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये 16 एप्रिल रोजी जहांगीरपुरी भागात झालेल्या दंगलीदरम्यान एक व्यक्ती (In a blue kurta) गोळीबार करताना दिसला होता. उत्तर पश्चिम जिल्ह्याचे पोलिस पथक त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी सीडी पार्क रोडवरील त्याच्या घरी गेले असता, कुटुंबीयांनी दगडफेक केली. या प्रकरणी 16 एप्रिल रोजी नोंदवलेल्या एफआयआर क्रमांक 440/22 च्या तपासाअंतर्गत पोलिसांनी दुसरा आरोपी शेख हमीद ( 36 years, Ra. Jahangirpura) यालाही अटक केली आहे. हमीद हा भंगार विक्रेता आहे.

ते पुढे म्हणाले, "कोणतीही व्यक्ती दोषी आढळल्यास, वर्ग, पंथ, समुदाय आणि धर्माचा विचार न करता त्याच्यावर कारवाई केली जाईल. गुन्हे शाखा आता या प्रकरणाचा तपास करत आहे. चार फॉरेन्सिक पथकांनी आज घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल मीडियाचे विश्लेषण केले जात आहे." विशेष म्हणजे दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान जहांगीरपुरी भागात शनिवारी दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळच्या हिंसाचारात दगडफेक झाली. यामध्ये काही वाहनेही जाळण्यात आली आहेत. जहांगीरपुरी हिंसाचारात पोलिसांनी दंगल, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत काही पोलिसांसह सुमारे 9 जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT