Rajiv Gandhi Death Anniversary Twitter /ANI
देश

Rajiv Gandhi Death Anniversary: पीएम मोदी अन् सोनिया गांधींनी वाहिली श्रद्धांजली

Rajiv Gandhi 31st Death Anniversary: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या 31 व्या पुण्यतिथीनिमित्त वीर भूमी या त्यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली

दैनिक गोमन्तक

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 31 व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी राष्ट्रीय राजधानीतील वीर भूमी येथे त्यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस नेते पी चिदंबरम आणि सचिन पायलट यांनीही दिल्लीतील वीर भूमी येथे माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.

राजीव गांधी यांनी 1984 मध्ये त्यांची आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा वयाच्या 40 व्या वर्षी ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. त्यांनी 2 डिसेंबर 1989 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले.

पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 31 व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहली आहे.

20 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक रॅलीदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT