Sonia Gandhi Dainik Gomantak
देश

Sonia Gandhi Hospitalized: सोनिया गांधींची तब्येत बिघडली, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi News: काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना तापामुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Manish Jadhav

Sonia Gandhi Health Update: काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना तापामुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

रुग्णालयाचे म्हणणे आहे की, सोनिया गांधी यांना तापामुळे 2 मार्च रोजी डॉक्टर अरुप बसू आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले.

'सोनिया गांधींची प्रकृती स्थिर'

बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, 'सोनिया गांधी (Sonia Gandhi) डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची तपासणी केली जात आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सर गंगाराम हॉस्पिटलच्या ट्रस्ट सोसायटीचे अध्यक्ष डीएस राणा यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना "तापामुळे" चेस्ट मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार अरुप बसू आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सोनिया गांधी या वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाल्या

या वर्षात त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. जानेवारीत, सोनिया गांधी यांना विषाणूजन्य श्वसन संसर्गाच्या उपचारासाठी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

SCROLL FOR NEXT