Sonia Gandhi Health Struggle Dainik Gomantak
देश

कर्करोगाशी दोनदा झुंज देताना हादरले होते; सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रातून उलगडला आजारपणाचा संघर्ष

Sonia Gandhi Health Struggle: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राजकीय आव्हानांसोबतच गंभीर आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागला.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राजकीय आव्हानांसोबतच गंभीर आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागला. त्यांना दोन वेळा कर्करोगासंदर्भातील आजाराचे निदान झाले होते. आतापर्यंत या आजारपणाबाबत मौन राखलेल्या सोनिया गांधी यांनी ‘बेलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातून प्रथमच आपल्या संघर्षाचा खुलासा केला आहे.

२०१० मध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अवघ्या वर्षभरात नियमित तपासणीदरम्यान स्वादुपिंडात (पॅनक्रियाज) आणखी एक गाठ आढळली. अधूनमधून होणारा दमा, ॲलर्जी आणि पोटाच्या तक्रारींचाही त्यांना त्रास होता. राजकारणातील सक्रियता, वाढते वय आणि तणावामुळे पोटाचे विकार वाढल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्या मनातून हादरल्या होत्या. वेळ दवडण्यास वाव नसल्याचे डॉक्टरांनी त्यांना आणि मुलांना स्पष्ट केले होते. माध्यमांमध्ये वैयक्तिक आयुष्याची चर्चा होऊ नये म्हणून त्यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाऐवजी मिलानजवळील युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी येथे उपचार घेण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या बहिणी नादिया व अनुष्का शस्त्रक्रियेवेळी उपस्थित होत्या.

वर्षभरानंतर स्वादुपिंडात गाठ आढळल्याने सोनिया गांधी आणि त्यांच्या मुलांना मोठा धक्का बसला. आधीचा कर्करोग पुन्हा उद्भवला असावा, अशी भीती वाटली.

राजीव गांधी दिसल्याचा अनुभव

ऑगस्ट २०१६ मध्ये वाराणसी येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी जाताना त्यांना गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले. पाच तासांच्या प्रवासानंतर थकव्यामुळे त्या कोसळल्या. त्यांना विमानाने दिल्लीला आणण्यात आले. बेशुद्धावस्थेत असताना दिवंगत पती राजीव गांधी दिसल्याचा अनुभव त्यांनी आत्मचरित्रात सांगितला आहे.

राजीव गांधी आपल्याकडे हात पुढे करून आश्वासकपणे हसत होते, जणू सर्व काही ठीक होईल असे सांगत होते, अशी आठवण त्यांनी लिहिली आहे. दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही विमानातील तणावपूर्ण वातावरणात सोनिया गांधी अचानक हसल्याचे सांगितले होते. या प्रसंगात त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आणि पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Trade Deal: अखेर सस्पेन्स संपला! हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंहच्या ट्रेडवर BCCI चा शिक्कामोर्तब; सॅलरीत कोणताही बदल नाही

Goa Ujjwala Scheme: मंत्र्यांचा दणका बसताच अधिकाऱ्यांची धावपळ; 'गोवा उज्ज्वला'च्या अर्जांची चार तालुक्यांत छाननी पूर्ण, बुधवारपासून लाभार्थ्यांना मिळणार पैसे!

VIDEO: आसगावात अग्नितांडव! चार कामगार होरपळले; एकाची प्रकृती चिंताजनक, गोमेकॉत उपचार सुरू

Kolkata Sairang Express Accident: मोठी बातमी! आसाममध्ये भीषण रेल्वे अपघात, कोलकाता-सैरांग एक्सप्रेसचे 7 डबे रुळावरुन घसरले; अनेक प्रवासी जखमी

Kadamba Employees Strike: कदंब कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे; कामगार आयुक्तांच्या बैठकीत तोडगा

SCROLL FOR NEXT