Sonia Gandhi  Dainik Gomantak
देश

सोनिया गांधी पुन्हा कोविड पॉझिटिव्ह, सरकारी प्रोटोकॉलनुसार करण्यात येणार क्वारंटाइन

ED चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Sonia Gandhi Covid Positive: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सरकारी प्रोटोकॉलनुसार त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्या आयसोलेशनमध्ये राहणार आहे."

सोनिया गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी 2 जून रोजी त्या कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते आणि त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोरोनापूर्वी सोनियांनी या नेत्यांची भेट घेतली होती

कोरोनाची लागण झाल्याचे समोर येण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. बिहार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. त्यांनी सीपीआयएम नेते सीताराम येचुरी यांचीही भेट घेतली.

प्रियांका गांधी कोरोना पॉझिटिव्ह

तीन दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यांनी आपल्या अधिकृत हँडलवरून ट्विट करून माहिती दिली होती. मला पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे आणि मी घरी कोविड प्रोटोकॉलचे पालन करत स्वत:ला विलगिकरण करून घेतले आहे. यापूर्वी 3 जून रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यापूर्वी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले होते की, सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात बुरशीजन्य संसर्ग झाला आहे. यापूर्वीच्या कोरोनानंतर त्याच्या नाकातून रक्त येत असल्याची चर्चा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: फेक क्राईम ब्रँच ऑफिसर, 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी अन् 42 लाखांवर डल्ला; भामट्याचा गेम ओव्हर, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

SCROLL FOR NEXT