Sonia Gandhi  Dainik Gomantak
देश

सोनिया गांधींना मिळाला डिस्चार्ज, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 23 जूनला होणार चौकशी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 75 वर्षीय सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. COVID-19 नंतर त्यांना 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Sonia gandhi discharged from hospital faces questioning in alleged money laundering case)

दरम्यान, नॅशनल हेराल्डप्रकरणी 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधींना समन्स जारी केले आहेत.

दुसरीकडे, सोनिया गांधींना (Sonia Gandhi) यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख देण्याची मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. तपास यंत्रणा आधीच काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करत असून ते आता सोमवारी ईडीसमोर हजर झाले आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी 20 नोव्हेंबर 1937 रोजी असोसिएटेड जर्नल लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. विविध भाषांमध्ये वर्तमानपत्रे प्रकाशित करणे हा त्या मागिल उद्देश होता. त्यानंतर इंग्रजीमध्ये नॅशनल हेराल्ड, हिंदीमध्ये नवजीवन आणि उर्दूमध्ये कौमी आवाज ही वृत्तपत्रे एजेएल अंतर्गत प्रकाशित करण्यात आली.

एजेएलच्या निर्मितीमध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांची भूमिका असली तरीही ते कधीही त्यांच्या मालकीचे नव्हते. कारण, 5000 स्वातंत्र्यसैनिक या कंपनीला पाठिंबा देत होते आणि ते त्याचे शेअर होल्डरही होते. 90 च्या दशकात ही वृत्तपत्रे तोट्यात जायला लागली 2008 पर्यंत एजेएलवर 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज होते. मग AJL ने निर्णय घेतला की यापुढे वर्तमानपत्र प्रकाशित करण्यात येणार नाही. वृत्तपत्रांचे प्रकाशन बंद केल्यानंतर AJL मालमत्ता व्यवसायात उतरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT