Plight
Plight Dainik Gomantak
देश

सिंगापूरने निर्बंध केले शिथिल; 'या' देशांतील नागरिकांना मिळणार प्रवेश

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा (Covid 19) प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे सिंगापूरमध्ये (Singapore) येणाऱ्या प्रवाशांवर रोख लावण्यात आला होता. मात्र आता सिंगापूरने कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. यामुळे बांग्लादेेश (Bangladesh), भारत (India), म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील नागरिक आता सिंगापूरला जाऊ शकतील. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली. भारतासह या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सिंगापूरमध्ये दोन आठवड्यांपूर्वी येण्यास परवानगी नव्हती. आता मात्र देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्यानंतर प्रवासाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या देशांतील प्रवासी 26 ऑक्टोबर 2021 पासून रात्री 11:59 वाजता सिंगापूरला जाऊ शकतील.

तथापि, या देशांतील प्रवाशांना कोरोना संबंधित कठोर नियमांचे पालन करावे लागेल. यामध्ये 10 दिवसांच्या स्टे एट होम नोटिस पिरियडच्या सूचनेचाही समावेश आहे. त्यांना कोरोनासाठी 10 दिवस डेडिकेटेड फैसिलिटीमध्ये राहावे लागेल. मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, त्या सहा दक्षिण आशियाई देशांमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना आरोग्य मंत्री ओंग ये कुंग म्हणाले, या देशांमधील परिस्थिती काही काळासाठी स्थिर झाली आहे. आता या देशांतील प्रवाशांना येथे उतरण्य रोखण्यासाठी कठोर नियमांची गरज नाही.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बुधवारी लागू झालेल्या बदलांमध्ये सिंगापूरचे जवळचे शेजारी, मलेशिया आणि इंडोनेशियामधील प्रवाशांसाठी सुलभ नियम देखील समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, 1 नोव्हेंबर 2021 पासून अत्यावश्यक कामगार आणि विद्यार्थ्यांना सिंगापूरच्या सीमांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. परंतु येथे येण्यापूर्वी त्यांना संपूर्ण कोरोना लसीकरण मिळाले असेल. शुक्रवारपर्यंत सिंगापूरमध्ये साथीच्या प्रारंभापासून एकूण एक लाख 65 हजार 663 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या आजाराने देशात आतापर्यंत 294 लोकांचा बळी घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmal Garbage : हरमल वेशीवर कचराच; विद्रूपीकरण थांबवा

Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राच्या आधारावर FIR रद्द होणार नाही, पती-पत्नीमधील वादात HC चा निर्णय

Morjim Beach : किनारपट्टीवर नशेचे सावट गडद ; युवापिढी संकटात

India Economy: भारत दशकातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, चीनला मागे टाकणार; UN नंतर IMF नं वर्तवलं भाकित

SCROLL FOR NEXT