Navjot Singh Siddhu 

Punjab

 

Dainik Gomantak 

देश

सिद्धू यांनी केजरीवालांना दिले 'हे' आव्हान

नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चर्चेचे आव्हान दिले आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाब (Punjab) काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांच्याशी राज्यातील दारू तस्करी, बेकायदेशीर खाणकाम आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर वाद घालण्यास नकार दिला. नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चर्चेचे आव्हान दिले आहे.

सिद्धूचे आव्हान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले, मात्र वाद विवादासाठी स्वत पुढे न येता
त्यांनी पक्षाच्या राज्य युनिटच्या प्रमुखांना पुढे केले. “@अरविंदकेजरीवाल (Arvind Kejriwal), भगवंत हे मुख्यमंत्री नाहीत. दिल्ली विमानतळ मार्गांवर बादलांच्या बसेसना कोण परवानगी देतंय? माझ्याशी वाद घालायला या! (sic),” पंजाब काँग्रेस (Congress) अध्यक्षांनी ट्विट केले.

सिद्धूच्या ट्विटला मान यांनी उत्तर दिले. त्यांनी नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Siddhu) यांच्यावर वादविवादापासून पळ काढल्याचा आरोप केला. “सिद्धू पाजी, तुम्ही मला का घाबरता? मुख्यमंत्री (चरणजीत सिंग) चन्नी यांच्या मतदारसंघातील अवैध वाळू उत्खननावर सिद्धू का बोलत नाहीत? चमकौर साहिबमधील बेकायदेशीर खाणकामावर त्यांनी एक शब्दही बोलला नाही, असे त्यांनी ट्विट केले. शनिवारी सुलतानपूर लोधी येथे एका सभेला संबोधित करताना सिद्धू यांनी दारू, खाणकाम आणि नोकऱ्यांवरील चर्चेसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान केले. तिथून या वादाला सुरुवात झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT