क्रिकेटविश्वातील देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर ही कायमच चर्चेत असते. विशेषतः तिच्या खासगी आयुष्यामुळे ती सातत्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स असून, तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकऱ्यांचे लक्ष असते. अभिनेत्री नसतानाही ती एक स्टार किड म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे.
सारा तेंडुलकर ही पूर्वीपासूनच तिच्या बॉलिवूडमधील मित्रमंडळींसोबत पार्टी करताना, इव्हेंट्समध्ये दिसत आहे. तिचे अनेक सेलिब्रिटी मित्र असून, ती बऱ्याचदा मुंबईतील हायप्रोफाईल पार्टीजमध्ये स्पॉट केली जाते. पण तिचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं ते क्रिकेटर शुभमन गिलसोबतच्या नात्यामुळे.
सारा आणि शुभमनच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होत्या. सोशल मीडियावरही त्यांची काही मॅचिंग पोस्ट्समुळे ही अफवा अधिकच जोर धरत होती. मात्र काही दिवसांपूर्वी या नात्यात दुरावा आल्याचं समोर आलं.
सूत्रांनुसार, सारा आणि शुभमन यांचं ब्रेकअप झालं आहे. इतकंच नाही, तर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो देखील केल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना अधिकच जोर मिळाला.
आता याच पार्श्वभूमीवर एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांचं नाव एकत्र जोडलं जात आहे. दोघे एकत्र वेळ घालवत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे. काही अनोळखी ठिकाणी त्यांना एकत्र पाहिल्याचं देखील सांगण्यात येत आहे. यामुळे सारा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
सिद्धांत चतुर्वेदी हा 'गली बॉय', 'फोन भूत' यांसारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध आहे. तो एक टॅलेंटेड आणि नव्या पिढीतील अभिनेता म्हणून ओळखला जातो. सिद्धांतचं नाव याआधी अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं, पण आता सारा आणि त्याचं नाव एकत्र येणं, हे बऱ्याच चाहत्यांसाठी धक्कादायक ठरत आहे.
या चर्चांवर अद्याप सारा, सिद्धांत यांनी कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. पण तरीही सोशल मीडियावर यासंदर्भातील चर्चा प्रचंड प्रमाणात रंगत आहेत. काही युझर्स या संबंधांवर मजेशीर मीम्स शेअर करत आहेत, तर काहींनी सारा आणि शुभमनच्या ब्रेकअपवर खंतही व्यक्त केली आहे.
सध्या तरी हे सर्व अफवांच्या पातळीवर असले तरीही सारा तेंडुलकरच्या वैयक्तिक आयुष्याविषयीचा उत्सुकतेचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आला आहे. येत्या काही दिवसांत यातून कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.