Edin Rose Claims Mother of Shreyas Iyer Kid
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार श्रेयस अय्यर हा केवळ क्रिकेटमधील खेळासाठीच नव्हे, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळेही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या स्टायलिश खेळाचा आणि शांत संयमी स्वभावाचा प्रभाव इतका आहे की अनेकांना तो 'परफेक्ट आयडियल' वाटतो. त्याच चाहत्यांच्या यादीत आता बिग बॉस १८ मधील स्पर्धक एडन रोझ हिचेही नाव जोडले गेले आहे, पण यावेळी तिचा दावा थेट धक्का देणारा आहे.
फिल्मी ज्ञान’ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना एडन रोझने म्हणाली, "मला वाटते की मी श्रेयस अय्यरच्या मुलाची आई आहे. मी मनातच त्याच्याशी लग्न केले आहे. तो मला दररोज प्रेरणा देतो. त्याची नम्रता, एकाग्रता आणि वर्तन मला खूप भावते."
एडन रोझ ही भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल असून तिचा जन्म दुबईमध्ये झाला आहे. ती २०२० साली भारतात आली आणि याच ठिकाणी स्थायिक झाली. ती सध्या बिग बॉस १८ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे.
तिच्या आदर्श जोडीदाराच्या बाबतीत बोलताना तिने सांगितले की, तिला ज्या चार गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, त्या म्हणजे चांगली उंची, गोरा रंग, दाढी असलेला चेहरा आणि आकर्षक शरीरयष्टी. हे सर्व गुण श्रेयस अय्यरमध्ये असल्याचे ती म्हणते. याआधीही तिने विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे उदाहरण देत त्यांना एक ‘परफेक्ट कपल’ म्हटले होते.
श्रेयस अय्यर सध्या काहीसे मैदानाबाहेर असला, तरी तो मुंबई टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला होता. मात्र, त्याच्या संघाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. याआधी आयपीएल २०२५ मध्ये अय्यर पंजाब किंग्जकडून खेळत होता, जिथे त्यांच्या संघाला आरसीबीविरुद्ध केवळ ६ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.