Shiva Tandava Video: श्रावण महिना १७ ऑगस्टपासून सुरू झाला असून आज पहिला श्रावण सोमवार आहे. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पुजा केल्याने अनेक समस्या दूर होतात. सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलिकडेच एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एआयचा वापर करून शिव तांडव करतांना दिसत आहे.
AI च्या मदतीने शिव तांडव तयार केले
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा प्रत्येक कामासाठी वापर केला जात आहे. एका कलाकाराने AI टूल्सचा वापर करून अद्भूत व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये भगवान शंकर अभूतपूर्व पद्धतीने तांडव करताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. AI टूल्सचा वापर करून कलाकाराने प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना द्रुबो सरकारवर भगवान शंकराची प्रतिमा तयार केली, ज्यांनी उत्कृष्ट शिव तांडव सादर केले होते.हा इफेक्ट इतका जबरदस्त आहे की हा व्हिडिओ पाहून असे वाटत आहे की साक्षात भगवान शंकर तांडव करत आहे असे जाणवते.
हा व्हिडिओ Wild Trance नावाच्या इंस्टाग्रापेजवर शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'शिव तांडव, ज्याला अनेकदा "शिवाचे सृष्टीचे नृत्य" म्हटले जाते, हे हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान शिवाशी संबंधित एक शक्तिशाली आणि प्रतिष्ठित नृत्य आहे.जतन, संरक्षण आणि विनाशाचे प्रतिक मानले जाते. असे मानले जाते की हे नृत्य भगवान शंकर वैश्विक ड्रमच्या तालावर करतात. जे विश्वाच्या शाश्वत लयवर त्यांचे नियंत्रण ठेवतात. शांत आनंद तांडवापासून ते रुद्र तांडवापर्यंत अशा विविध व्याख्या आणि शैली आहेत. हे वैश्विक संतुलन आणि अस्तित्वाच्या गतिशील शक्तींचे गहन प्रतिनिधित्व आहे. ”
हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केल्यापासून हजारो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेक युजर्संनी कमेंट करत लिहिले की ही आयडिया शेअर करावी तर काही युजर्संनी व्हिडिओचे आणि शास्त्रीय डान्सरचे कौतुक केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.