Shraddha Walkar Murder Case Dainik Gomantak
देश

Shraddha Murder Case: दिल्ली हत्याकांडात मोठी अपडेट! श्रद्धाच्या हाडांचा डीएनए वडिलांच्या डीएनएशी झाला मॅच

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा हत्याकांडात गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे. हाडांच्या डीएनए नमुन्याचा अहवाल आला असून तो श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी मॅच झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे. हाडांच्या डीएनए नमुन्याचा अहवाल आला असून तो श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी मॅच झाला आहे. म्हणजेच, जंगलातून जप्त केलेली अस्थी श्राद्धाचीच होती. 26 नोव्हेंबर रोजी श्रद्धाच्या हाडांचा डीएनए तिच्या वडिलांच्या डीएनएशी मॅच झाला असल्याचे सांगण्यात आले होते. 18 मे रोजी श्रद्धाची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने निर्घृणपणे हत्या केली होती. श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यापूर्वी त्याने मृतदेह दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील निवासस्थानी फ्रिजमध्ये ठेवला होता.

दरम्यान, आफताबला पोलिसांनी (Police) नोव्हेंबरमध्ये श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. गेल्या आठवड्यात श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आपल्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या तिच्या लिव्ह इन पार्टनरला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील (Maharashtra) वसई पोलिसांवर आरोप करताना विकास वालकर म्हणाले होते की, 'आफताबच्या विरोधात 2020 मध्ये आपल्या तक्रारीवर कारवाई झाली असती तर श्रद्धा आज जिवंत असती.' आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी करुन त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली होती.

गेल्या आठवड्यात, दिल्ली न्यायालयाने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. 26 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 13 दिवसांची वाढ केली होती.

शिवाय, 2 डिसेंबर रोजी आफताबची नार्को चाचणी करण्यात आली, जी फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अधिकाऱ्यांनी तुरुंगात केली होती. पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट या दोन्हींचे निष्कर्ष न्यायालयात वैध नाहीत. या चाचण्या केवळ दिल्ली पोलिसांना पुरावे गोळा करण्यात मदत करतील आणि त्यामुळे दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

Horoscope: संकष्टी चतुर्थीला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, समृद्धी, नोकरीची संधी आणि धनवर्षाव

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

SCROLL FOR NEXT