Shraddha Walkar Murder Case Dainik Gomantak
देश

Shraddha Murder Case: आफताबला तुरुंगात हवी इंग्लिश पुस्तके, तुरुंग प्रशासनाकडे केली मागणी

श्रद्धा वालकर खूनप्रकरणातील आरोपी आफताबची तिहार तुरुंग प्रशासनाकडे एक मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

श्रद्धा वालकर खूनप्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्याने तिहार तुरुंग प्रशासनाकडे एक मागणी केली आहे. ज्यावर तिहार प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे समोर आले आहे.

आफताबाने तुरुंगात कांदबरी आणि साहित्याची पुस्तके वाचण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर तुरुंग प्रशासनाकडून लवकरच त्याला पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी माहिती तिहार तुरुंगातील सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

वसईतील 26 वर्षीय श्रद्धा वालकर प्रकरणामुळे देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब अमिन पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली आहे. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकून दिले होते. तब्बल सहा महिन्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता श्रद्धा वालकर खून प्रकरणात नव नवीन माहिती समोर येत आहे.

श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर दिल्लीतील पोलिसांनी (Delhi Police) आफताबला अटक केली आणि चौकशी सुरु केली आहे. सध्या आफताबची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यात येत आहे. नार्को चाचणीत आफताबने धक्कादायक माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT