Nagaland Assembly Election 2023 Result | Sharad Pawar | Ramdas Athawale  Dainik Gomantak
देश

Nagaland Assembly Election: राष्ट्रवादीसह आठवलेंच्या 'आरपीआय'चा नागालँडमध्ये डंका; जिंकल्या 'इतक्या' जागा

राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता

Akshay Nirmale

Nagaland Assembly Election 2023 Results: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनी ईशान्य भारतातील नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीत यश मिळवले आहे

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल सात उमेदवार विजयी झाले आहेत. तर आठवलेच्या रिपाईंचे 2 उमेदवार जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला नागालँडमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. तर, रामदास आठवले यांच्या पक्षाचे दोन उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीकडे महाराष्ट्रातही विरोधी पक्षनेतेपद आहे.

नागालँडमधील विधानसभेत भाजप-एनडीपीपी आघाडीने 37 जागा जिंकल्या आहेत. पैकी 25 जागा एनडीपीपी ने जिंकल्या असून भाजपला 12 जागांवर विजय मिळला आहे. नागालँडमध्ये बहुमतासाठी 31 जागांची गरज आहे.

गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सहा जागा लढवल्या होत्या पण एकाही ठिकाणी विजय मिळालेला नव्हता. तर, भाजपने 20 जागा लढवून 12 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने गतवेळी 18 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.

नागालँडमध्ये चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला (राम विलास) 2 जागांवर विजय मिळाला आहे. तर चार जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. नागा पीपल्स फ्रंटला दोन जागांवर विजय मिळाला आहे. या राज्यात एनडीपीपीला 32.33 टक्के मते मिळाली.

तर, भाजपला 18 टक्के मते मिळाली. काँग्रेसला 3.54 टक्के मते मिळाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला एका जागेवर विजय मिळाला असून त्यांना 3.24 टक्के मते मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT