shaheen bagh case heroin worth 900 crores recovered from haider up home in gujarat ats raid Dainik Gomantak
देश

900 कोटींचे हेरॉईन जप्त, गुजरात एटीएसने केली कारवाई

या सिंडिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक

दैनिक गोमन्तक

दिल्लीच्या शाहीन बाग ड्रग्स प्रकरणात, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील शाहीन बाग येथून अटक करण्यात आलेल्या ड्रग तस्कर हैदरच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून 150 किलोहून अधिक हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईनची किंमत सुमारे 900 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे हेरॉईन गुजरात एटीएसने जप्त केले आहे.

हैदरला दिल्ली एनसीबीने शाहीन बाग येथील एका घरातून पकडले होते, जेव्हा त्याच्या शाहीन बागेतील घरातून 300 कोटी रुपयांचे 50 किलो हेरॉईन, 30 लाख रुपये रोख आणि 47 किलो इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

आज गुजरात एटीएसने मुझफ्फरनगरमधील हैदरच्या घराजवळील शेजारच्या घरावर छापा टाकून 150 किलो हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणी गुजरात एटीएस संध्याकाळी 5 वाजता गुजरातमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे.

शाहीन बाग ड्रग्स प्रकरणावर, एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की शाहीन बाग ड्रग्स प्रकरणाशी संबंधित पाचवी अटक हवाला व्यापारी शमीम अहमदला करण्यात आली आहे. शमीम दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात राहत होता. ड्रग्जचा व्यवहार आणि मुख्य आरोपींपर्यंत पैसे पोहोचवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तो दुबईत शाहिदला ड्रग मनी पाठवत होता. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. या सिंडिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज सिंडिकेटच्या संबंध दुबई, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणशी जोडलेले आहेत.

ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, अटारी बॉर्डर आणि गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेले हेरॉईन, प्रत्येकाचा स्त्रोत एकच असल्याचे दिसते. आमची टीम गुजरात आणि अटारी सीमेवरही जाऊन आरोपींची चौकशी करणार आहे. आम्ही पकडलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी कस्टमचे पथक आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT