Shaheen Afridi Record Dainik Gomantak
देश

Shaheen Afridi Record: बुमराहला पछाडलं! शाहीन आफ्रिदी बनला T20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

Shaheen Afridi T20 Wicket Record: तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने अफगाणिस्तानचा 39 धावांनी पराभव केला.

Sameer Amunekar

तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने अफगाणिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. या सामन्यात शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानी संघासाठी चांगली कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने डावाच्या सुरुवातीला इब्राहिम झद्रानला बाद करून अफगाण संघाला धक्का दिला.

शाहीन आफ्रिदीने चार षटकांत २१ धावा देत दोन विकेट घेतल्या. त्याने सामन्यात इब्राहिम झदरान आणि मुजीब उर रहमान यांचे बळी घेतले. सामन्यात दोन विकेट घेऊन त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत भारताच्या जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये आफ्रिदीच्या नावावर ३१४ विकेट आहेत. तर बुमराहने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ३१३ विकेट घेतल्या आहेत.

पाकिस्तानी टी-२० संघाव्यतिरिक्त, शाहीन आफ्रिदी जगभरातील अनेक लीगमध्ये खेळतो. त्याने आतापर्यंत २२५ टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण ३१४ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी १९ धावांत ६ विकेट्स घेणे आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पाच वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावा केल्या. त्यानंतर, हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीसमोर अफगाणिस्तान संघाला फक्त १४३ धावा करता आल्या.

रशीद खानने शेवटी अफगाणिस्तान संघासाठी जलद धावा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने १६ चेंडूत ३९ धावा केल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, पाकिस्तानकडून सलमान अली आघा याने सर्वाधिक ५३ धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याच्या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT