Ludhiana News  Dainik Gomantak
देश

''मुलं मुलींना पीजीमध्ये बोलावतात अन्...'', वापरलेल्या कंडोममुळे गटार झाले जाम; लोक संतापले

Ludhiana News: लुधियानामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात येथील एका कॉलीनीतील गटार तुंबले होते.

Manish Jadhav

Ludhiana News: लुधियानामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात येथील एका कॉलीनीतील गटार तुंबले होते. कॉलीनीतील रहिवाशांनी गटार साफ करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना बोलावले.

सफाई कर्मचाऱ्यांनी गटाराचे झाकण उघडले असता आतमध्ये शेकडो कंडोम आढळून आले. हे पाहून परिसरातील नागरिक संतप्त झाले. परिसरातील लोकांनी पीजीमध्ये राहणाऱ्या मुलांवर आरोप करत सांगितले की, मुले खुलेआम मुलींना पीजीमध्ये बोलावतात आणि इथे चुकीचे काम करतात. त्यांच्या या कृत्यामुळे गटार तुंबले असून नागरिकांना त्रास होत आहे.

पीजीमध्ये मुले उघडपणे मुलींना बोलावतात

दरम्यान, हे प्रकरण संजय गांधी नगर, वॉर्ड क्र 20, ताजपूर रोड, लुधियाना येथील आहे. येथील गटार तुंबले होते. लोकांनी स्वच्छता कर्मचार्‍यांना साफसफाईसाठी बोलावले. सफाई कर्मचाऱ्यांनी गटाराचे झाकण उघडले असता ते अवाकच झाले.

शेकडो वापरलेल्या कंडोमने सांडपाणी साचले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी सांगितले की, इथे पीजीमध्ये राहणारे मुले उघडपणे मुलींना बोलावून चुकीचे काम करतात. त्यामुळे परिसरातील गटार ठप्प झाले आहे.

याचा परिणाम स्थानिकांना भोगावा लागत आहे. पीजी लवकरात लवकर खाली करण्याची मागणी त्यांनी पोलिस (Police) प्रशासनाकडे केली आहे.

'पीजीमध्ये बेकायदेशीर कृत्य होत असेल, तर ते खाली केले जाईल'

याबाबत अनेकवेळा पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र मुलांनीही पोलिसांबरोबर सेटिंग केल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी (Citizens) सांगितले. या तरुणांमुळे आपली सून, मुली, मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. पीजी तात्काळ खाली करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

मुले रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालतात. त्यामुळे येथील शांतता आणि सुव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. मात्र, पीजी मालकाने ही जागा भाड्याने घेतल्याचे सांगितले. त्यांच्या पीजीमध्ये काही बेकायदेशीर कृत्य होत असल्यास त्याची तात्काळ दखल घेतली जाईल, असे पीजी मालकाने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT