Cyber Crime Dainik Gomantak
देश

Cyber Crime: पैशांसाठी तरुणीचे व्हिडिओ, चॅट आणि फोटो व्हायरल; वाचा नेमकं प्रकरण

Manish Jadhav

Senior IT Professional Woman Meet Cyber Harassment: गुजरातमधील अहमदाबादमधून हॅकिंग आणि सायबर फसवणुकीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अज्ञात व्यक्तीने 27 वर्षीय तरुणीला सोशल मीडियावर मेसेज करुन 20 हजार रुपयांची खंडणी मागितली. जेव्हा तरुणीने खंडणी देण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांमध्ये तिचे चॅट आणि व्हिडिओ शेअर केले. या डिजिटल आरोपीला कंटाळून तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

इंस्टाग्रामवर खंडणीची मागणी केली

पीडितेने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, ती सीनियर आयटी प्रोफेशनल आहे. गेल्या एक वर्षापासून ती इन्स्टाग्राम वापरत होती. 20 सप्टेंबर रोजी तिला 'Anastasia Goa' नावाच्या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर एक मेसेज आला. पीडितेने ओळख पटवण्यासाठी मेसेजला उत्तर दिले. पीडितेने उत्तर दिल्यानंतर लगेचच 20 हजार रुपयांची खंडणी मागितली. यासोबतच खंडणीची रक्कम न दिल्यास पीडिता आणि तिचा प्रियकर यांच्यातील अश्‍लील चॅट आणि व्हिडीओ त्यांच्या मित्रपरिवारात शेअर करु, अशी धमकीही त्याने दिली. जेव्हा पीडितेने याचा पुरावा मागितला तेव्हा त्याने तिच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या.

महिलेचा प्रियकरावर संशय

पीडितेला पहिला संशय तिच्या प्रियकरावर आला. ती पहिल्यांदा याविषयी प्रियकराशी बोलली. तिने त्याला विचारले की त्याने चॅटचे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ कोणाशी शेअर केले आहेत का? मात्र, पीडितेच्या प्रियकराने असे काहीही केले नसल्याचे सांगितले. प्रियकराने पीडितेला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडितेने 19 डिसेंबरला पोलिसांत तक्रार करुन एफआयआर दाखल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT