Mukul Rohatgi Twitter
देश

ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांचा अटर्नी जनरल होण्यास नकार, Govt चा फेटाळला प्रस्ताव

KK Venugopal: भारताचे वर्तमान अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल आहेत.

दैनिक गोमन्तक

Senior Advocate Mukul Rohatgi: देशातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारचा अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यांनी ऑफर नाकारण्यामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचे सांगितले आहे. भारताचे वर्तमान अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल आहेत. त्यांनी औपचारिकपणे 30 जून 2017 पासून त्यांचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा होता. मधेच त्यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला होता, मात्र आता त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एएनआयशी बोलताना मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) म्हणाले की, 'भारत सरकारचा प्रस्ताव न स्वीकारण्यामागे कोणतेही विशेष कारण नाही.' मुकुल रोहतगी यांनी यापूर्वी 2014 ते 2017 दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारमध्ये एजीची जबाबदारीही सांभाळली होती.

वेणुगोपाल यांना 2017 मध्ये जबाबदारी सोपवण्यात आली

रोहतगी यांच्यानंतर 15 जुलै 2017 रोजी वेणुगोपाल यांना एजीची जबाबदारी देण्यात आली होती. यासोबतच त्यांना त्यांच्या कार्यकाळात तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान, त्यांनी सूचित केले होते की, सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण एजी म्हणून आपला प्रवास सुरु ठेवणार नाही. 2020 मध्ये, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही, त्यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु केंद्र सरकारने (Central Government) त्यांना एजी म्हणून कायम राहण्याची विनंती केली होती.

अ‍ॅटर्नी जनरल पद?

भारत सरकारमध्ये अ‍ॅटर्नी जनरल हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अ‍ॅटर्नी जनरल भारत सरकारच्या मुख्य कायदेशीर सल्लागाराची भूमिका बजावतात आणि सर्व कायदेशीर बाबींवर केंद्र सरकारला सल्ला देतात. अ‍ॅटर्नी जनरलची नियुक्ती भारत सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT