COVID-19 second wave Dainik Gomantak
देश

COVID-19 ची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे (Union Health Ministry) जॉईन सेक्रेटरी लव आग्रवाल यांनी ही माहीती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारीच्या (COVID-19) तीसऱ्या लाटेबद्दल वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात असतानाच आता अजुन एक चिंता वाढवणारी माहीती समोर आली आहे. जगभरात आजही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची प्रकरणे नोंदवली जात आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुची साथ अजूनही संपलेली नाही. या सर्व परिस्थितीमध्ये भारताचा विचार केल्यास भारतातील दुसरी लाट अजूनही संपलेली नाही असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे जॉईन सेक्रेटरी लव आग्रवाल यांनी केले आहे.

दरम्यान, तिसऱ्या लाटेचा विचार केल्यास संशोधकांच्या एका गटाने केलेल्या अभ्यासानुसार भारतात ऑगस्टमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांनी असेही म्हटले आहे की, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असू शकते.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे एपिडेमिओलॉजी आणि संसर्गजन्य रोग प्रमुख डॉ.समीरन पांडा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोविड -19 ची तिसरी लाट आली तर ती ऑगस्टच्या अखेरीस येईल.

तिसऱ्या लाटेत दररोज 100,000 ते 150,000 संसर्गाची प्रकरणे नोंदविली जाऊ शकते असा दावा हैदराबाद आणि कानपूर येथील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून समोर आले आहे.


दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT