Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

Bihar Teacher Video Viral: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मोबाईल प्रत्येकाच्या हाती असल्याने कोणताही गैरप्रकार त्वरित रेकॉर्ड केला जातो.

Manish Jadhav

Bihar Teacher Video Viral: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मोबाईल प्रत्येकाच्या हाती असल्याने कोणताही गैरप्रकार त्वरित रेकॉर्ड केला जातो. अनेकदा ट्रेनमध्ये घडणाऱ्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी, असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक महिला एसी कोचमध्ये विनातिकीट प्रवास करत होती. तिकीट दाखवण्यास नकार दिल्यावर टीटीईने त्या महिलेला ट्रेनमधून खालीही उतरवले होते. आता या घटनेनंतर स्टेशनवर जो राडा झाला, त्याचा दुसरा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

स्टेशनवर कुटुंबासह गोंधळ

नवीन व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, त्या महिलेने तिच्या काही नातेवाईकांना स्टेशनवर बोलावून घेतले आहे आणि आता तिथे टीटीईसोबत जोरदार वादविवाद (Argument) सुरु आहे. महिलेचे वडील टीटीईला उद्देशून बोलत आहेत की, "तुझा वाद तर तिच्याशी झाला होती ना?" त्याचवेळी, ती महिला टीटीईवर आरोप करते की, तो तिचा व्हिडिओ (Video) बनवून व्हायरल करण्याची धमकी देत होता आणि तिच्याशी गैरवर्तन करत होता. मात्र आता या गोंधळात ती महिला टीटीईला धमकी देते की, "जर तो इथे आला, तर ती त्याचे मुंडके कापेल." हा व्हिडीओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर @ChapraZila नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला.

व्हिडीओ पोस्ट करताना टीका

व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ही बिहारची तीच शिक्षिका आहे, जी विनातिकीट एसीमध्ये प्रवास करत असताना टीटीईशी गैरवर्तन करत होती. आता ती आपल्या वडिलांना सोबत घेऊन टीटीईला धमकी देण्यासाठी पोहोचली आहे.' कॅप्शनमध्ये पुढे म्हटले की, "अशा महिलेला शिक्षक पदावरुन तातडीने बडतर्फ (Dismiss) केले पाहिजे. जी स्वतः नियम तोडते, ती मुलांना काय संस्कार देणार? शिस्तीशिवाय असलेला शिक्षक (Teacher) समाजासाठी कलंक आहे." सरकारी शिक्षिका असूनही विनातिकीट प्रवास करणे आणि नंतर अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्यामुळे या प्रकरणाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT