SBI Apprentice Recruitment 2021 Dainik Gomantak
देश

SBI Apprentice Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, महिन्याला 15,000 पगार

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 6100 अ‍ॅप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

दैनिक गोमन्तक

SBI Apprentice Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 6100 अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. या दरम्यान त्यांना महिन्याला 15,000 पगार देण्यात येणार आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल. (SBI Apprentice Recruitment 2021: Recruitment for more than 6000 posts of apprentice in State Bank of India)

भरतीच्या महत्त्वपूर्ण तारखा

6 जुलै 2021 पासून अ‍ॅप्रेंटिसच्या या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021 आहे. अद्यापर्यंत एसबीआयने भरतीसाठी परीक्षेच्या तारखांची घोषणा केलेली नाही.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

एसबीआयच्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेली असली पाहिजे. या पदासाठी 20 ते 28 वर्षा दरम्यामने उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादेतील आरक्षणाच्या नियमांबद्दल आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जावून माहिती बघावी लागले.

अर्जसाठी फी अशी भरा

जनरल, ओबीसी EWS श्रेणीच्या उमेदवारांना अर्जाची फी 300 रूपये असणार आहे. एससी, एसटी आणि दिव्यांगाना शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवार केवळ डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारेच अर्जाची फी भरू शकतात. अन्य माध्यमांद्वारे अर्जाची फी स्वीकारली जाणार नाही.

अर्ज कसा करावा

अ‍ॅप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या https://sbi.co.in/web/careers वेबसाइटवर भेट द्यावी लागेल . एसबीआयच्या वेबसाइटवर तुम्हाला या भरतीची जाहिरात मिळेल, त्या आधारे तुम्ही अर्ज भरू शकता. आपण या लिंकवर https://www.rojgarresult.com/upload/SBI%20Apprentice%20Advt.%202021.pdf क्लिक करुन अधिक माहिती पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

"रंगपंचमीलाच रक्ताचा सडा!" प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या बायकोची भररस्त्यात केली हत्या; संतापलेल्या नवऱ्यानं काढला काटा

SCROLL FOR NEXT