Video Viral Dainik Gomantak
देश

वाचवा मॅडम, आम्हाला ओलीस ठेवले जाईल; कामगारांची स्मृती इराणी यांच्याकडे विनंती Video Viral

काही मजूर अमेठीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच सलोन विधानसभेचे भाजप आमदार अशोक कोरी यांच्याकडे न्यायाची याचना करताना दिसून येत आहेत.

दैनिक गोमन्तक

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मजूर अमेठीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smiriti Irani) तसेच सलोन विधानसभेचे भाजप आमदार अशोक कोरी यांच्याकडे न्यायाची याचना करताना दिसून येत आहेत. (Save madam we may be held hostage Workers request to Smriti Irani Video Viral)

पोलीसही त्यांच्या तक्रारी ऐकत नसल्याचा कामगारांचा आरोप आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, न्याय मागणारे मजूर रायबरेली जिल्ह्यातील देह पोलीस स्टेशन हद्दीतील दोस्तपूर बुधबारा, प्रतापगड जिल्ह्यातील बाबागंज येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे तर व्हिडीओ मधील सर्व जण उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील एका भट्टीवर कामासाठी गेला होता.

एप्रिल 2021 मध्ये देह पोलिस स्टेशन परिसरातील दोस्तपूर बुधबारा येथील कामगार उत्तराखंडमधील हरिद्वार पोलिस स्टेशनच्या पिरान कालियार जिल्ह्यातील सार्वजनिक शेतात काम करण्यासाठी गेले होते तर गेल्या तीन महिन्यांपासून भट्टीमालकाने कामगारांना मजुरी दिलेली नाहीये. मजुरी मागितल्याने त्यांना मारहाण केली जात आहे, या संपूर्ण प्रकाराबाबत कामगारांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली, मात्र कारवाई अध्याप झालेली नाही.

उलट मोबाईल चोरीचा आरोप करत भट्ट मालकाने सर्व कामगारांना बेदम मारहाण केली. मदत न मिळाल्याने हताश झालेल्या कामगारांनी व्हिडिओ व्हायरल करून अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि सलोनचे आमदार अशोक कोरी यांना तेथून परत आणण्याची विनंती केली आहे.

18 हजार रुपये दरमहा देण्याचे सांगण्यात आले होते,

आता परत दोस्तपूर बुधबारा गावातील रहिवासी अमरनाथ, मनोज, लालू, रमेश, मंगल, उदयराज, धर्मेंद्र आणि अमरनाथ यांच्या म्हणण्यानुसार, मालकाने सर्व मजुरांना दरमहा 18 हजार रुपये देण्याचे बोलले होते, परंतु तसे झालेले नाहीये.

व्हायरल व्हिडिओमध्ये मजुरांनी असाही आरोप केला की, आता त्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था नाही किंवा त्यांना घरी पाठवण्यासाठी एकूण पैसेही दिले जात नाहीत, आता ते ज्या कपड्यांमध्ये आले होते त्याच कपड्यांमध्ये ते राहत आहेत.

व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर कुटुंबाची वाईट अवस्था

त्रस्त मजुरांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे आवाहन केले की, त्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी सुखरूप परत पाठवावे, अन्यथा या असहाय्यतेत ते सर्व ओलीस राहतील तर हा व्हायरल व्हिडीओ पीडितांच्या गावात पोहोचताच नातेवाईकांची दुरवस्था झाली.

त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर परत आणण्याची मागणीही नातेवाईकांनी परिसर पोलिसांकडे केली आहे तर आता यावर जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय मंत्री कितपत प्रयत्न करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT