salman khan Dainik Gomantak
देश

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

Battle of Galwan First Look Out: सलमान खान या वर्षी 'सिकंदर' चित्रपटात दिसला, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

Manish Jadhav

Battle of Galwan First Look Out: सलमान खान या वर्षी 'सिकंदर' चित्रपटात दिसला, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. यानंतर, दबंग खान आता त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे, ज्याचे नाव 'गलवान' आहे. सलमान खानच्या या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शुक्रवारी (4 जुलै) रिलीज झाले. भाईजान एका दमदार लूकमध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये सलमानचा चेहरा रक्ताने माखलेला दिसत आहे. सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. यासोबतच त्याने लिहिले की, 'गलवान व्हॅली'.

सत्य घटनेवर आधारित चित्रपट

दरम्यान, सलमानचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये म्हटले की, 'हे युद्ध समुद्रसपाटीपासून सुमारे 15 हजार फूट उंचीवर लढले गेले. भारताने एकही गोळी न चालवता हे सर्वात धोकादायक युद्ध लढले'. पोस्टरमध्ये सलमान खानच्या डोळ्यात देशभक्तीची भावना दिसून येते.

सलमान खानच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण

सलमानने गुरुवारी (3 जुलै) रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात 'बॅटल ऑफ गलवान'ची झलक समोर आली. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत बरीच चर्चा सुरु झाली होती. मात्र संध्याकाळपर्यंत सलमानने चाहत्यांना भेट म्हणून पहिली झलक दाखवली. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात धोकादायक चकमक झाली होती. हा परिसर लडाखमध्ये आहे. या चकमकीत बंदुकीतून एकही गोळी चालली नव्हती. मात्र अनेक भारतीय सैनिक शहीद झाले होते.

नेटिझन्सनी काय म्हटले?

'बॅटल ऑफ गलवान'च्या पोस्टर नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. नेटीझन्स सलमानचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले की, 'भाईजान शब्बास' तर दुसऱ्याने लिहिले की, 'पोस्टर पाहून मन सुन्न झाले. दुसरीकडे, ऑपरेशन सिंदूरदरम्यान गप्प राहिल्याबद्दल काही नेटिझन्स सलमानला ट्रोलही करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT