Drugs Dainik Gomantak
देश

Sahibabad | 1.20 कोटीचे हेरॉईन सह तीन तस्करांना अटक

Seizure of heroin | हेरॉईनची विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीतील तीन तस्करांना गुन्हे शाखेने केली अटक

दैनिक गोमन्तक

साहिबाबाद : बरेली येथून THA च्या चार ठिकाणी 1.20 कोटी रुपयांच्या हेरॉईनची विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीतील तीन तस्करांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.आरोपी तैयब खान,शहजाद खान रा,पीरबोधा पोलीस चौकी क्रमांक-२ इज्जतनगर आणि सैफ रा.भामोरा बरेली अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. पोलिसांनी तस्करांकडून एक्सयूव्ही (XUV) कार आणि 750 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. टोळीचा म्होरक्या घटनास्थळावरून पसार झाला आहे.

गुन्हे शाखेचे प्रभारी अब्दुर रहमान सिद्दीकी यांनी सांगितले की,टोळीचा म्होरक्या मोहम्मद आतिफ आहे. या तिन्ही तस्करांना हिंडन एअरफोर्स स्टेशन चौकाजवळून पकडण्यात आले आहे. चौकशीत या तिघांनी साहिबााबाद,विजयनगर, कौशांबी आणि इंदिरापुरम येथे हेरॉईनचा पुरवठा केल्याचे सांगितले.मोहम्मद आतिफचा भाऊ सैफ हेरॉईनचा पुरवठा करण्यासाठी सदस्यांना दिवस,वेळ,ठिकाण आणि वाहन पुरवायचा.

पुढील काही दिवसांत हे तिघेही हरियाणा,उत्तर प्रदेश,उत्तराखंड,राजस्थान,दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये हेरॉईनचा पुरवठा करणार होते. चौकशीदरम्यान हा आरोपी स्वत:गाझियाबादमध्ये हेरॉइनची तस्करी करण्यासाठी आला होता,मात्र गुन्हे शाखेच्या पथकाला पाहून तो मागे फिरला आणि मोहम्मद सौबी आणि अन्य एका सदस्यासह पळून गेला.

नेपाळ कनेक्शन

या टोळीचे कनेक्शन नेपाळ पर्यात जोडलेले आहेत.आरोपी मोहम्मद आतिफ अनेकदा सीमेवर जातो आणि टोळीशी संबंधित लोकांना भेटून परत येतो. इंदिरापुरम,कौशांबी,साहिबाबाद आणि विजयनगर या भागात टोळीच्या संगनमताने हेरॉइनची विक्री करणारे एजंट कोण आहेत,याचा शोध घेण्याचा पोलिस सध्या प्रयत्न करत आहेत. अब्दुर रहमान सिद्दीकी यांनी सांगितले की,वरिष्ठ पोलिस अधीक्षक मुनिराज जी. त्यांच्या सूचनेवरून पोलिसपथक पुढील तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT