Rajasthan Village Electricity News Dainik Gomantak
देश

Electricity in Baran: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली वीज! 78 वर्षांनंतर दुर्गम भागात दिवाळी

Rajasthan Village Electricity News: राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या एका वस्तीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७८ वर्षांनंतर वीजजोडणी झाली आहे.

Sameer Panditrao

कोटा (राजस्थान): राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या एका वस्तीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७८ वर्षांनंतर वीजजोडणी झाली आहे. गावकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर या गावात आता वीजेचा प्रकाश पडत आहे. या वस्तीतील प्रत्येक घरात वीजपुरवठा सुरू झाला आहे.

बारन जिल्ह्यातील सांवरा गावात सहारिया समुदायाची ४० घरे आहेत. या वस्तीची लोकसंख्या सुमारे दोनशे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून दरम्यानच्या काळात देशाने अनेक आघाड्यांवर प्रगती केली असली तरी दुर्गम भागांत असलेल्या काही गावांमध्ये अद्याप वीजही पोहोचलेली नाही.

डोंगराळ भागात असलेले सांवरा हे त्यापैकीच एक गाव होते. या गावातील लोकांनी अनेकवेळा सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर मागील महिन्यात गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गावात बोलवत त्यांच्याकडे तक्रार केली.

या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्ह्याधिकाऱ्यांनी आवश्‍यक ते आदेश दिले. वीजमंडळाने वीस ते पंचवीस दिवस सलग काम करत सांवरा गाव उजळवून टाकले. अनेक दशकांच्या अंधारानंतर आता कुठे प्रकाश दिसला आहे, अशी प्रतिक्रिया या गावातील लोकांनी व्यक्त केली.

सहारिया समुदाय हा विशेष संरक्षित आदिवासी समूह आहे. पंतप्रधान-जनमन योजनेअंतर्गत या आदिवासी समुदायाला सरकारकडून पक्की घरेही मिळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT