माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर एका मोठ्या आंतरराष्ट्रीय मोहिमेत झळकणार आहे. सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असलेली सारा लवकरच ऑस्ट्रेलियाच्या नव्या पर्यटन मोहिमेचा (Tourism Campaign) महत्त्वाचा भाग होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल ११३७ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या मोहिमेची तयारी केली आहे. या मोहिमेअंतर्गत ऑस्ट्रेलिया वेगवेगळ्या देशांमधून प्रसिद्ध चेहऱ्यांची निवड करत आहे, जेणेकरून त्या देशांतील नागरिकांना ऑस्ट्रेलियाला भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
भारतातून या मोहिमेचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सारा तेंडुलकरवर सोपवण्यात आली आहे. ती ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रमोशनल उपक्रमात सहभागी होणार आहे. यामध्ये जाहिराती, सोशल मीडिया कॅम्पेन आणि विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतून ऑस्ट्रेलियाचे पर्यटन ठिकाणे जगासमोर मांडली जाणार आहेत.
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या स्टायलिश लुक्सपासून ते ग्लॅमरस फोटोंपर्यंत, सारा नेहमीच चर्चेचा विषय ठरते. पण अलीकडे तिच्या पोस्टवरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की तिला ऑस्ट्रेलियाबद्दल खास आकर्षण आहे.
सारा तेंडुलकरने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला अनेक वेळा भेट दिली आहे. ती प्रत्येक वेळी त्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणांचा अनुभव घेते आणि त्याबद्दल फोटो आणि व्हिडिओज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करते. समुद्रकिनारे, निसर्गरम्य स्थळे, सिडनीचे ऑपेरा हाऊस, ग्रेट बॅरियर रीफ, मेलबर्नच्या रंगीबेरंगी रस्त्यांवरचे क्षण असे अनेक फोटो तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
सारा फक्त पर्यटनासाठीच नाही तर तिथल्या संस्कृती, खाद्यपदार्थ आणि लाइफस्टाइलचा आनंद घेताना दिसते. तिच्या पोस्टवरून हे लक्षात येते की ऑस्ट्रेलियामध्ये तिला साहसिक खेळ, बीच व्हाइब्स आणि निसर्गाची शांतता खूप आवडते. तिचे लाखो फॉलोअर्स त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. अनेकदा चाहते तिच्याकडून ट्रॅव्हल टिप्ससुद्धा विचारतात.