Sachin pilot Dainik Gomantak
देश

सचिन पायलट सोनिया गांधींच्या भेटीला, हायकमांड ठरवणार नवी भूमिका

सचिन पायलट यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. अशोक गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या येत असताना ही बैठक झाली आहे. राजस्थान आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या पक्षातील भविष्यातील भूमिकेबाबत ही बैठक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. विशेषत: काँग्रेसने (Congress) पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यापूर्वी सचिन पायलट हे राजस्थान (Rajasthan) काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री होते. परंतु 2020 मध्ये त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याने त्यांना दोन्ही पदे गमवावी लागली होती.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. राहुल गांधींच्या निकटवर्तीयांचा विचार केला तर आता फक्त सचिन पायलटच पक्षात उरले आहेत. कारण ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद आणि आरपीएन सिंह यांसारख्या नेत्यांनी भाजपची वाट धरली.

तसेच, सचिन पायलट यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री व्हायचे असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु 2018 च्या राजस्थान निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला तेव्हा त्यांना मुख्यमंत्री बनवले गेले नाही. त्यांच्या जागी दिग्गज नेते अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दोन वर्षांनंतर, त्यांनी 18 आमदारांसह पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली. तथापि, त्यांचे मन पुन्हा वळवण्यात आले. सचिन पायलट यांच्या बंडाने अशोक गेहलोत यांचे सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT