प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. यावेळी त्यांच्या हत्येविरोधात दिल्ली आणि पंजाबमध्ये उग्र निदर्शने झाली. काँग्रेसने या हत्येला राजकीय हत्या ठरवत मूस वालाची सुरक्षा का कमी करण्यात आली असा सवाल केला होता. यानंतर मूसवाला यांच्या हत्येबाबत तर्क - वितर्क लावले जात होते. या बाबत सुचक विधान करत मी मूसवाला गोळी मारली आहे. असं लॉरेन्सचा पुतण्या सचिन बिश्नोई याने म्हटले आहे. ( Sachin Bishnoi say I shot Muswala )
याबाबत सचिन बिश्नोई म्हणाले कि, 'मी स्वतः सिद्धू मुसेवालाला गोळी मारली.' स्वत:ला सचिन बिश्नोई म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने व्हर्च्युअल आयडीद्वारे एका टीव्ही चॅनलशी झालेल्या संवादात हा दावा केला आहे. मोहाली येथील विकी मिड्डूखेडा यांच्या हत्येचा आम्ही बदला घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम त्याने स्वत:चे वर्णन सचिन थापन असे केले. सचिन बिश्नोई बोलतोय का, असा प्रश्न पत्रकाराने त्यांना विचारला असता त्यांनी हो म्हटले. तो म्हणाला गुंड हा माझा आदर्श आणि काका आहे. खरा सचिन बिश्नोई यानेच हत्येचा दावा केला असला तरी याला दुजोरा देता येत नाही.
पंजाबमधील आप सरकारकडून सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी मानसा जिल्ह्यामध्ये गायक सिद्धू यांची अज्ञातांनी गोळ्या मारून हत्या केली होती. सिद्धू यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन काल करण्यात आले. 5 डॉक्टर्सच्या टीमने शवविच्छेदन केले होते. दरम्यान, उत्तराखंड स्पेशल टॉस्कच्या मदतीने काही संशयितांना पकडल्याची माहिती आहे. पकडण्यात आलेले लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे. संशयितांना देहराडूनमधील नया गाव चौकीवर पकडण्यात आले. त्या सर्वांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.