Russian Tourist Viral Post Dainik Gomantak
देश

Viral Post: "अरे बापरे! भारत इतका वेगळा आहे?" रशियन पर्यटक महिलेनं शेअर केला अनुभव, पोस्ट व्हायरल

Russian Tourist Viral Post: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, पण एका परदेशी नागरिकासाठी इथली जीवनशैली कधीकधी चक्रावून टाकणारी असू शकते.

Sameer Amunekar

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, पण एका परदेशी नागरिकासाठी इथली जीवनशैली कधीकधी चक्रावून टाकणारी असू शकते. रशियन उद्योजिका अनास्तासिया शारोवा सध्या तिच्या भारत दौऱ्यातील अनुभवांमुळे इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे.भारत प्रवासाला निघण्यापूर्वी मला या गोष्टी ठाऊक असत्या..." अशा शीर्षकाखाली तिने शेअर केलेले अनुभव वाचून भारतीय युजर्सना हसूही येत आहे आणि ते तिच्या निरीक्षणांशी सहमतही होत आहेत.

१० मिनिटांची डिलिव्हरी

अनास्तासियाने भारतातील ऑनलाइन सुविधांचे तोंडभरून कौतुक केले आहे. भारतात मिळणाऱ्या १० मिनिटांच्या ग्रोसरी डिलिव्हरीमुळे ती इतकी प्रभावित झाली आहे की, तिने सुपरमार्केटमध्ये जाणेच बंद केले आहे. मात्र, डिजिटल व्यवहार करताना वारंवार येणाऱ्या 'ओटीपी' (OTP) वरून तिने मिश्किल टिप्पणी केली. तिच्या मेसेज बॉक्समध्ये सध्या सर्वात जास्त कोणता शब्द दिसत असेल तर तो म्हणजे 'OTP', असे तिने गंमतीने म्हटले आहे. तसेच, यूपीआय (UPI) मुळे पैशांचे व्यवहार किती सोपे झाले आहेत, हेही तिने आवर्जून सांगितले.

भारतीयांच्या स्वभावावर भाष्य करताना अनास्तासिया म्हणते, "इथले लोक कधीच कोणाला थेट 'नाही' म्हणत नाहीत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे हावभाव वाचायला मला शिकावे लागले." प्रवासाबाबत बोलताना तिने एक मजेशीर मुद्दा मांडला.

भारतात नकाशावर दिसणारे अंतर (किलोमीटर) आणि प्रत्यक्षात प्रवासाला लागणारा वेळ यांचा कोणताही ताळमेळ नसतो, असा अनुभव तिने सांगितला. याशिवाय, पंख्याच्या आवाजाची लागलेली सवय आणि गल्लीत मोठा ट्रक आल्यावर बंद पडणारे इंटरनेट यांसारख्या इथल्या स्थानिक समस्यांनाही तिने आपल्या यादीत स्थान दिले आहे.

भारतातील कौटुंबिक संस्कृतीवर भाष्य करताना तिने स्पष्ट केले की, जर कोणी तिला 'आंटी' म्हणून हाक मारली, तर त्याचा अर्थ ती म्हातारी दिसते असा नसून तो एक सन्मान आहे, हे समजायला तिला वेळ लागला. तिच्या बागेतील फळे पिकण्यापूर्वीच माकडे फस्त करतात, ही तक्रारही तिने मांडली. सोशल मीडियावरील युजर्सनी तिच्या या प्रांजळ मतांचे स्वागत केले आहे. काहींनी तिला भारतीय मान्सूनचा अनुभव घेण्यासाठी केरळ किंवा मुंबईला जाण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी भारत हा देश नसून एक 'उपखंड' असल्याचे सांगत तिच्या भाषिक निरीक्षणाचे समर्थन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

Goa Nightclub Fire: 'क्लबमधील आगीच्या दुर्घटनेला कर्मचारी जबाबदार'! लुथरा बंधूंनी झटकले हात; पोलिस तपासात असहकार्य

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

SCROLL FOR NEXT