shivangi singh Dainik Gomantak
देश

Republic Day Parade 2022: शिवांगी सिंग राफेल उडवणारी भारताची पहिली महिला

फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग राफेल लढाऊ विमान (Rafale Fighter Jet) उडवणारी भारतातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे.

दैनिक गोमन्तक

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) संपूर्ण देशात साजरा होत आहे. या निमित्ताने आज दिल्लीतील राजपथावर देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून पहायला मिळाले. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री,लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होत आहे. फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग (Shivangi Singh) राफेल लढाऊ विमान (Rafale Fighter Jet) उडवणारी भारतातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे. ती नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाली होती.

भारताचे (India) लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करणाऱ्या भव्य वार्षिक परेडमध्ये शिवांगी सिंग (Shivangi Singh) भारतीय वायुसेनेच्या झांकीचा एक भाग होती. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आयएएफच्या प्रदर्शनात एक बँड, एक मार्चिंग तुकडी आणि राफेल, मिग-21 विमाने आणि 3D पाळत ठेवणारे रडार अस्लेशा एमके-1 च्या मॉडेलसह एक झांकी दाखवण्यात आली.

या झांकीची थीम होती "भारतीय वायुसेनेचे भविष्यासाठी परिवर्तन".अनेक भारतीयांनी सोशल मीडियावर शिवांगी सिंग हिच्यासाठी जल्लोष करताना दिसले. भारतीय हवाई दलाच्या 17 “गोल्डन एरोज” स्क्वॉड्रनचा एक भाग आहे, हरियाणाच्या अंबाला शहरात स्थित असलेल्या भारतीय हवाई दलाच्या 17 “गोल्डन एरोज” स्क्वॉड्रनचा शिवांगी सिंग एक भाग आहे. तिचे मुळगाव वाराणसी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

High Court: "सनातन संपवण्याची भाषा म्हणजे नरसंहाराला चिथावणी" निवडणूक वर्षात उदयनिधि स्टालिन यांना हायकोर्टाकडून चपराक!

"मुक्या प्राण्यांच्या जिवाची इतकीच किंमत का?" मर्सिडीजनं कुत्र्याला चिरडलं, कोर्टानं केली 150 रुपयांत सुटका! प्राणीप्रेमींचा संताप

NH66 Highway Goa: राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नवीन अपडेट! रुंदीकरणाचे काम होणार सुरु; 764 कोटी मंजूर

Terror Attack: 'या' इस्लामिक देशात नरसंहार! 31 निष्पाप नागरिकांची गोळ्या झाडून हत्या; लष्करी राजवटीत हिंसाचाराचा उद्रेक

Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

SCROLL FOR NEXT