Lockdown in Karnataka Dainik Gomantak
देश

कर्नाटकात लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता

राज्यामध्ये कोरोना रुगणांची संख्या कमी झाल्यानंतर येडियुरप्पा सरकारने (Yeddyurappa government) निर्बंध शिथिल केले आहेत.

दैनिक गोमन्तक

बंगंळूरु: राज्यामध्ये कोरोना रुगणांची (Covid 19) संख्या कमी झाल्यामुळे येडियुरप्पा सरकारने (Yeddyurappa government) निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली आहे. येत्या 5 जुलैपासून राज्यात लॉकडाऊनच्या (lockdown) नियमात आणखी काहीशी शिथिलता आणण्यात येणार आहे. यामुळे व्यापारी आणि नागरिकांना काही प्रमाणात काहीसा दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने कोविड निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. 5 जुलैपासून ते 19 जुलैपर्यंत त्याची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. दुकाने सकाळी 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक वर्गातील दुकानांच्या वेळमध्येही वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, रेस्टॉरंट, क्लब, हॉटेलही पू्र्ण आसन क्षमतेने सुरु ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. जीम आणि व्यायामशाळा पूर्ण क्षमतेने सुरु राहणार आहेत. प्रार्थना मंदीर, इतर प्रार्थनास्थळांना दर्शनासाठी परवानगी असणार आहे. मगंल कार्यालयामध्ये 100 जणांना परवानगी असणार आहे. मात्र थिएटर आणि सिनेमागृहे बंद असणार आहेत. शाळा, कॉलेजही बंद ठेवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT