manish sisodiya 
देश

दिल्लीला कोवॅक्सिन लसीचे डोस द्यायला नकार; उपमुख्यमंत्री सिसोदिया आक्रमक

दैनिक गोमंतक

कोवॅक्सिन कोरोना लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकने दिल्लीला लस पुरवण्यास नकार दिला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज ही माहिती दिली. या प्रकरणात केंद्र सरकारला लक्ष्य करुन त्यांनी केंद्राची 'लसीची गैरव्यवस्था' असे संबोधले. दुसरीकडे कंपनीने म्हटले आहे  हे दुर्दैव आहे की काही राज्ये आपल्या हेतूंबद्दल तक्रारी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, कोरोनामधील युद्धामध्ये ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता आहे.  आता भारताला लसीचा तुटवडा जाणवत आहे. राजधानी दिल्लीतही लसींचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो आहे. परिस्तिथी एवढी खराब आहे की लसीकरण केंद्र बंद करावे लागेल. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की दिल्ली सरकारने 1.34 कोटी लसींची मागणी केली होती, त्यामध्ये दोन्ही प्रकारच्या लसींचा समावेश आहे. पण कोवॅक्सिन लसीच्या निर्मात्यांनी दिल्ली सरकारला स्पष्टपणे लिहिले आहे की लस उपलब्ध नसल्यामुळे ते त्यांना लस देऊ शकत नाहीत. (Refuses to give covacin vaccine to Delhi; Deputy Chief Minister Sisodia became aggressive)

मनीष सिसोदिया पुढे म्हणाले भारत बायोटेकने त्यांना सांगितले केंद्र सरकारने आम्हाला जेवढी लस द्यायला सांगितली आहे तेवढीच देऊ शकतो. अशा परिस्थितीत कोवाक्सिनचा पुरवठा दिल्लीत बंद आहे आणि त्यांनी लेखी देऊन लस देण्यास नकार दिला आहे, कारण ते केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार लस देत आहेत.शिसोदिया म्हणाले की त्यांनी 67 लाख लस मागितल्या आहेत. परंतु कोवाक्सिनच्या पत्रावरून हे स्पष्ट झाले आहे की ही लस कोणाला व कधी मिळेल याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. सिसोदिया म्हणाले केंद्र सरकारने आपली भूमिका बजावावी व तातडीने निर्यात थांबवावी अशी सूचना केली.

दुसरीकडे, भारत बायोटेकचे सह-संस्थापक सुचित्रा एल्‍ला यांनी त्यास उत्तर म्हणून लिहिले की, 'कोवाक्सिनने 10 मे 2021 रोजी 18 राज्यांना कमी पुरवठा पाठविला आहे. दुर्दैवाने काही राज्ये आपल्या हेतूवर शंका घेत आहेत. कोविडमुळे आमचे 50 कर्मचारी कामावरुन बाहेर गेले आहेत, तरीही आम्ही दिवसातून 24 तास आपल्यासाठी काम करीत आहोत'. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की या दोन कंपन्यांची उत्पादन क्षमता मर्यादित आहे. या दोघांकडून फॉर्म्युला घेऊन, ज्या कंपन्या लसी बनवू शकतात अशा सर्व कंपन्यांना फॉर्म्युला देण्यात यावा आणि मोठ्या प्रमाणात लस तयार करावी. आंतरराष्ट्रीय बाजारात जिथे लस उपलब्ध आहे तिथून ही लस उपलब्ध करून देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचा रौद्रावतार! 10 षटकार अन् 8 चौकारांसह ठोकलं शानदार शतक; न्यूझीलंडच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

SCROLL FOR NEXT