Ministry of Information and Broadcasting Media Advisory
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत Action Mode मध्ये आला आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, दोन देशांनी कठोर पाऊले उचलली आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील माध्यमं या घडामोडींचे लाईव्ह कव्हरेज करत असून, याप्रकरणी केंद्र सरकारने माध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व माध्यम वाहिन्यांना सुरक्षा दलांचे ऑपरेशन्स आणि हालचालींचे थेट कव्हरेज न करण्याची सूचना केली आहे. देश हिताच्या दृष्टीने माध्यमांनी काळजी घ्यावी असा, मंत्रालयाने म्हटले आहे.
माध्यमांसाठी सरकारची नियमावली काय आहे?
१) सुरक्षा विभागाशी संबधित बाबींचे रिपोर्टींग करताना काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करावे. देश हितासाठी या बाबींचा विचार करुन कायदा आणि नियमांचे भान ठेवावे.
२) रिअल -टाईम - कव्हरेज करु नये. संवेदनशील विषयाचा खुलासा अगोदरच केल्यास त्याचा ऑपरेशन्सवर आणि सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
३) जबाबदारीने रिपोर्टींग किती महत्वाचे आहे याबाबत भूतकाळातील घटना साक्ष देतात. कारगिल युद्ध, मंबई दहशतवादी हल्ला, कंधहार हायजॅक अशा प्रसंगी केलेल्या रिपोर्टींगमुळे विविध परिणामाचा सामना करावा लागला होता.
४) राष्ट्रीय सुरक्षेत माध्यमं, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि नागरिक महत्वाची भूमिका बजावतात.
५) टीव्ही चॅनलने नियम ६ (१) (पी) अंतर्गत नियमाचे पालन करावे, असे मंत्रालयाच्या नियमावलीत म्हटले आहे. सुरक्षा दलाची दहशतवाद विरोधातील कारवाईचे थेट प्रेक्षेपण करु नये. अशी कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचे प्रेक्षेपण करु नये असे हा नियम सांगतो.
६) या नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा देखील सामना करावा लागेल. त्यामुळे टीव्ही चॅनलने दहशतवाद विरोधी कारवाई किंवा सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रेक्षेपण कर नये. दरम्यान, अधिकारी अधिकृतपणे याबाबत माहिती देतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.