ravindra jadeja Dainik Gomantak
देश

IND vs ENG: सर जडेजा पुन्हा रचणार इतिहास! व्हीव्हीएस लक्ष्मणचा रेकॉर्ड निशाण्यावर; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Ravindra Jadeja Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 31 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाईल.

Manish Jadhav

Ravindra Jadeja Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 31 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखण्यात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार शतके झळकावली. दरम्यान, जडेजाने पाचव्या कसोटी सामन्यात 21 धावा अधिक केल्यास त्याच्या नावावर एक खास रेकॉर्ड नोंदवला जाईल.

जडेजाच्या नावावर होऊ शकतो आणखी एक रेकॉर्ड!

एका कसोटी मालिकेत भारतासाठी सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (VVS Laxman) नावावर आहे. लक्ष्मणने 2002 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या (West Indies) मालिकेत 474 धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना 454 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, जर त्याने पुढील सामन्यात 21 धावा अधिक केल्यास, तो याबाबतीत व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकेल आणि हा विक्रम आपल्या नावावर करेल. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रवी शास्त्री (Ravi Shastri) आहेत, ज्यांनी 1984-85 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 374 धावा केल्या होत्या.

भारतासाठी एका कसोटी मालिकेत सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:

  • व्हीव्हीएस लक्ष्मण - 474 धावा, विरुद्ध वेस्ट इंडीज, 2002

  • रवींद्र जडेजा - 454 धावा, विरुद्ध इंग्लंड, 2025

  • रवी शास्त्री - 374 धावा, विरुद्ध इंग्लंड, 1984-85

इंग्लंड मालिकेतील रवींद्र जडेजाची कामगिरी

इंग्लंडविरुद्धच्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) बॅटने (Batting) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. आतापर्यंत त्याने 4 सामन्यांच्या 8 डावांमध्ये 113.50 च्या सरासरीने 454 धावा केल्या आहेत. या मालिकेत जडेजाने एक शतक (Century) आणि 4 अर्धशतके (Half-centuries) झळकावली आहेत. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 107 धावा आहे.

दुसरीकडे, गोलंदाजीबद्दल (Bowling) बोलायचे झाल्यास तिथे त्याची कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नाही. 4 सामन्यांमध्ये जडेजाला फक्त 7 विकेट्स मिळवता आल्या आहेत. आता पाचव्या कसोटी सामन्यात तो कोणत्या प्रकारची कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT