Representative image Dainik Gomantak
देश

शेतकऱ्याने उपचारासाठी जमवलेले 2 लाख उंदराने कुरतडले

तेलंगणाच्या (Telangana) शेतकऱ्याने (Farmer) मोठ्या मेहनतीने या जमा केलेले हे पैसे उंदराने पुर्णपणे कुरतडून टाकल्यामुळे शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमन्तक

तेलंगणाच्या महाबुबाबाद (Mahabubabad, Telangana) जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी भुक्या रेडिया नाईक यांनी परिचितांकडून कर्ज घेउन तसेच, भाजीपाला विक्रीतून मिळवलेल्या उत्पन्नातून बचत करुन 2 लाख रुपये जमा केले होते. त्यांना पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची आवश्यकता होती. हे पैसे सुरक्षित रहावे म्हणुन त्यांनी घरातल्या कपाटात ठेवले होते. मात्र काही काळानंतर या शेतकऱ्याने जेव्हा दवाखान्यात जाण्यापुर्वी कपाट उघडुन पाहीले तेव्हा शेतकऱ्याला मोठा धक्का बसला. (Rats chew up farmers 2 lakh rupees)

मोठ्या मेहनतीने या शेतकऱ्याने जमा केलेले हे पैसे उंदराने पुर्णपणे कुर्तडुन टाकले. या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. ही घटना समोर आल्यानंतर तेलंगणाचे आदिवासी, महिला व बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड यांनी शेतकऱ्याला त्याच्या वैद्यकीय उपचार खर्चात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

मंत्री सत्यवती राठोड यांनी रविवारी, 18 जुलै रोजी आश्वासन दिले की, शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळतील आणि योग्य ती वैद्यकीय सेवा मिळेल. यापूर्वी शनिवारी महाबूबाबाद जिल्ह्यातील वेन्नूर येथील इंदिरानगर भागातील आदिवासी शेतकरी भुक्या रेडिया नाईक यांनी साठवून ठेवलेले पैसे उंदीरांनी कुर्तडल्याचे वृत्त समोर आले आहे.

मंत्र्यांच्या सूचनेवरून स्थानिक तहसीलदारांनी घटनेची चौकशी केली आहे. तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार, CMRF मार्फत वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असलेला सर्व पाठिंबा शेतकऱ्याला मिळेल, असे आश्वासन मंत्र्यांनी महसूल अधिकाऱ्यांनी दिले. मंत्री सत्यवती यांनीही या शेतकऱ्याशी संवाद साधुन आश्वासन दिले आहे आणि चिंता दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. तहशीलदारांनी असेही सांगितले की, या नोटांवरचे सिरियल नंबर दिसत असतील तर त्या नोटा परत मिळू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT