Ratan Tata Dainik Gomantak
देश

आयुष्याच्या शेवटी रतन टाटा आरोग्य क्षेत्रासाठी करणार भरीव काम

आसाममधील एका कॅन्सर उपचार केंद्र उद्घाटन प्रसंगी केले स्पष्ट

दैनिक गोमन्तक

आपला दानशुर स्वभाव, राष्ट्रप्रेमापोटी केलेली मदत आणि समाजातील अंतिम घटकाच्या मदतीसाठी कायम सक्रिय अशी ज्यांची जगभर ओळख आहे ते उद्योगपती रतन टाटा यांनी पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार असल्याची घोषणा केली आहे. आसाममधील डिब्रूगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्करोग उपचार केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते. (Ratan Tata will do lot for health sector in country )

वेळी रतन टाटा पुढे म्हणाले की, आसाममध्ये १७ कॅन्सर उपचार केंद्रांचं नेटवर्क तयार करण्यात येत आहे. या रुग्णालयांमधून केवळ आसामच नव्हे तर देशभरातील सर्वच रुग्णांना सुलभ उपचार मिळेल. कारण कर्करोग हा केवळ श्रीमंतांचा आजार नाही. अत्याधुनिक सुविधांमुळे आसाम जागतिक दर्जाचं कर्करोग उपचार देणारं सक्षम राज्य म्हणून ओळखलं जाईल. आसामच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी म्हटलं. राज्यात यापूर्वी उपलब्ध नसलेल्या कर्करोगावरील अनेक उच्चस्तरीय आरोग्य सुविधा येथे आणण्यात येत आहे.

यामुळे केवळ आसामच नव्हे तर देशभरातील जवळपास ५० हजार कर्करोगग्रस्त रुग्णांना दरवर्षी जीवदान मिळणार आहे. कर्करोगावर उपचार करणारं टाटा समूहाचं हे देशातील सर्वात मोठं जाळं असणार आहे. यातील सात कर्करोग उपचार केंद्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT