Rameshwaram Cafe Blast ISIS Connection Dainik Gomantak
देश

Rameshwaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफे स्फोटामागे ISIS कनेक्शन; बंगळुरुमध्ये दहशत माजवण्याचा होता प्लॅन

Manish Jadhav

Rameshwaram Cafe Blast ISIS Connection:

कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. कॅफे स्फोटातील आरोपी हल्लेखोराचे आयएसआयएसशी कनेक्शन समोर आले आहे. हिंदू नेते दहशतवादी संघटनांचे टार्गेट होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. चार वर्षांपूर्वीही स्फोट घडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र टार्गेट चुकले होते. या स्फोटाप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अब्दुल मतीन, मुसाफिर हुसेन आणि सय्यद अली हे अद्याप फरार आहेत. त्यांनी बंगळुरुमध्ये स्फोट घडवून आणल्याचा पोलिस आणि एनआयएला संशय आहे.

दरम्यान, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने आणि बंगळुरुमध्ये दहशत निर्माण करण्याच्या कटाचा एक भाग म्हणून बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली आहे. हिंदू नेत्यांना टार्गेट करुन हा स्फोट झाल्याचा संशय आहे.

पोलिसांनी चार वर्षांपूर्वी सुद्दागुंटेपल्या मध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बंगळुरुमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील आरोपी हल्लेखोर अद्याप सापडलेला नाही, पण एक एक करुन त्यांचा सुगावा लागत आहे आणि त्यांनी कोणत्या मार्गाने प्रवास केला याची माहिती मिळाली आहे. विशेषत: बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीची गुप्त माहिती एनआयएला मिळाली होती. आरोपी त्यांच्याशी संपर्क होता.

हल्लेखोराचे दहशतवादी संघटनांशी संबंध

दुसरीकडे, NIA ची टीम काल पहाटे 4 वाजता बेल्लारीत दाखल झाली. त्यांनी थेट टँक बंडू रोड येथील निवासी शब्बीर याला अटक केली. त्याला बंगळुरु येथे आणून चौकशी करण्यात आली. तोरागल्लूजवळील एका प्रसिद्ध खासगी कंपनीत काम करणारा शब्बीर या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे.

हल्लेखोराला आणखी तीन जणांनी मदत केल्याचा संशय आहे. एनआयएने सय्यद अली, मास्टरमाइंड अब्दुल मतीन आणि मुझफ्फर हुसेन यांचा शोध घेतला आहे. सय्यद अली हा टेक्निशियन असून त्याने डार्क वेबद्वारे माहिती गोळा करुन बॉम्ब बनवल्याचा संशय आहे. स्फोटाच्या दिवशी मुझफ्फर बंगळुरुमध्ये होता.

दुसरीकडे, रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरण अधिक गडद होत चालले आहे. एनआयएची एक टीम आधीच बेल्लारीमध्ये असून हल्लेखोरांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे.

शिवमोग्गा मॉड्यूल सारखा स्फोट

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात, कॅफेमध्ये आरोपीचे पोहोचणे आणि बाहेर पडण्याच्या डझनभर सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयिताची ओळख पटली आहे. यासह, 2020 ते 2023 दरम्यान राज्य पोलिस आणि एनआयएने ISIS च्या शिवमोग्गा मॉड्यूलच्या सदस्यांचा पर्दाफाश केला. अब्दुल ताहा माथीन आणि मुसावीर हुसेन शाजिब हे शिवमोग्गा मॉड्यूलचे दोन बेपत्ता संशयित रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख संशयित म्हणून समोर आले आहेत.

तथापि, तपासकर्त्यांना अद्याप मुख्य संशयिताचे स्थान किंवा कॅफे हल्ल्यातील साथीदारांच्या ओळखीचा पुरावा सापडला नाही, कारण या गटाने ऑपरेशन दरम्यान गुप्त संवाद आणि ओळख लपवली होती. जरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित कॅफेमध्ये सेल फोन वापरत असल्याचे दिसत असले तरी.

कॅफे परिसरातील सेल डेटावरुन तपासात अद्याप संशयिताच्या सेल फोनचा पुरावा मिळालेला नाही. या सगळ्यादरम्यान रामेश्वरम कॅफे पुन्हा सुरु झाला आहे. रामेश्वरम कॅफेच्या मालक दिव्या राघवेंद्र राव यांनी सांगितले की, या घटनेने भारतीयांचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने रामेश्वरम कॅफे पुन्हा सुरु होत आहे, हा त्याचा पुरावा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT