Ramdev Baba  Dainik Gomantak
देश

Baba Ramdev Video: मुस्लिम पुरुषांनी हिंदू महिलांचे अपहरण करून...रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य, FIR दाखल

बाबांच्या या वक्तव्यावरून देशभरात राजकारण तापू लागले आहे.

Pramod Yadav

राजस्थान दौऱ्यावर असलेले योगगुरू बाबा रामदेव यांना नमाजवर मुस्लिम समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाबांच्या या वक्तव्यावरून देशभरात राजकारण तापू लागले आहे. राज्यातही अनेक ठिकाणी बाबांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

टोंक जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लीम समाज आणि वकिलांनी बाबाच्या विरोधात निदर्शने करत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बाबांच्या वक्तव्यावर राज्य अल्पसंख्याक आयोगानेही नाराजी व्यक्त केली आहे.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी योगगुरू रामदेव यांच्याविरोधात बारमेरमधील चौहटन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक रहिवासी पठाई खान यांनी रविवारी योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे चौहाटन ठाणेदार भुताराम यांनी सांगितले आहे.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्यावर आयपीसी कलम 153 ए (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान या कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 295 ए (जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्य, धर्माला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबा रामदेव यांनी काय विधान केले?

बाबा रामदेव यांनी 2 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात संतांच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदू धर्माची तुलना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माशी केली. तसेच, मुस्लिमांवर दहशतवादाचा प्रसार करण्याचा आणि हिंदू महिलांचे अपहरण केल्याचा आरोप केला. त्यांनी आरोप केला की दोन्ही धर्म धर्मांतराचे वेड आहेत, तर हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगले कर्म करण्यास शिकवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Name Change: 37 वर्षाच्या व्यक्तीला 42 वर्षांचा मुलगा कसा? नाव बदलून 'नीज गोंयकार' भासवण्याचा परप्रांतीयांचा खटाटोप

Goa Assembly Live: आलेमाव यांनी वनहक्क दाव्यांचा मुद्दा उपस्थित केला

Opinion: जून, जुलैत गोव्यात पाऊस उसंत न घेता अक्षरश: कोसळत असतो..

Goa Tribal Reservation: आदिवासी आरक्षणावरून विधानसभेत गदारोळ! 'काँग्रेसमुळेच विधेयक अडकले', मुख्यमंत्र्यांचे युरी-वीरेश-सरदेसाईंना जोरदार प्रत्युत्तर

Goa Flight Cancelled: हिंडन ते गोवा विमानसेवा रद्द; ऐनवेळी प्रवाशांचे नियोजन बिघडले, एअर इंडिया एक्सप्रेसवर संताप

SCROLL FOR NEXT