Rakshabandhan to gods Dainik Gomatnak
देश

Raksha Bandhan: 'या' देवांना राखी बांधा, संकटाना दूर पळवा! जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व

Raksha bandhan traditions: रक्षाबंधन हा अत्यंत पवित्र आणि भावनिक सण असून, भावंडांमधील प्रेम आणि संरक्षणाचे नाते साजरे करण्याचा दिवस आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून प्रार्थना करतात.

Sameer Panditrao

पुणे : रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भावनिक सण असून, भावंडांमधील प्रेम आणि संरक्षणाचे नाते साजरे करण्याचा दिवस आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. मात्र, केवळ भावांनाच नव्हे तर काही देवतांनाही रक्षा सूत्र बांधण्याची परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मान्यता अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी विशिष्ट रंगाच्या राख्या विशिष्ट देवतांना बांधल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि संकटांपासून संरक्षण मिळते.

भोलेनाथाला बांधा हिरव्या रंगाची राखी

सावन पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस, हा शंकर भगवानाशी विशेषतः संबंधित मानला जातो. भोलेनाथाला हिरव्या रंगाची राखी बांधल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो, असे शास्त्र सांगते. शांती, सात्विकता आणि नैसर्गिक ऊर्जा यांचे प्रतीक असलेला हिरवा रंग भोलेनाथाला अत्यंत प्रिय आहे.

गणपती बाप्पाला बांधा लाल राखी

विघ्नहर्ता श्री गणेश हे सर्व कार्यांच्या आधी पूजले जातात. त्यांना लाल रंगाची राखी बांधल्यास जीवनातील सर्व अडचणी, अडथळे दूर होतात आणि कार्यसिद्धी मिळते. लाल रंग ऊर्जा, उत्साह आणि यशाचे प्रतीक आहे. म्हणूनच रक्षाबंधनाला प्रथम गणेशजींना राखी अर्पण केली जाते.

हनुमानजींसाठी लाल किंवा केशरी राखी

शौर्य, पराक्रम आणि बुद्धी यांचे प्रतीक बजरंगबली हनुमानजींना राखी बांधल्यास बल, साहस, आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. तसेच, मंगळ दोष आणि नकारात्मकतेपासूनही बचाव होतो. लाल किंवा केशरी रंगाची राखी हनुमानजींसाठी विशेष शुभ मानली जाते.

श्रीकृष्णाला बांधा निळी राखी

रक्षाबंधनाचा संबंध महाभारतातील द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या कथााशी आहे. द्रौपदीने कृष्णाला जेव्हा राखी बांधली, तेव्हा त्यांनी तिला आजन्म संरक्षणाचे वचन दिले. श्रीकृष्णाला निळ्या रंगाची राखी बांधल्यास जीवनातील दुःख दूर होतात आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते. निळा रंग विश्वास, अध्यात्मिकता आणि निष्ठेचे प्रतीक आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने देवतांना राखी बांधण्याची ही परंपरा भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा संगम आहे. योग्य रंगाची राखी आणि भक्तिभावाने केलेली पूजा नक्कीच जीवनात सौख्य आणि समृद्धी घेऊन येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT